Goa Mining Bidding: अकरा कंपन्यांकडून 24 निविदा सादर

दुसऱ्या टप्प्यात पाच खनिज ब्लॉक्सचा 17 एप्रिल रोजी लिलाव
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mining Bidding: राज्य सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दुसऱ्या पाच खनिज ब्लॉक्ससाठी 11 कंपन्यांनी 24 निविदा सादर केल्या आहेत. आज या निविदा उघडण्यात आल्या.

त्यानंतर पुढील दोन दिवस या निविदांचे तांत्रिक दस्तऐवज तपासण्यात येतील, अशी माहिती खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी दिली.

डॉ. शानभोग म्हणाले की, राज्य सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने पहिल्या 4 खनिज ब्लॉक्सचा 13 सप्टेंबर2022 रोजी लिलाव जाहीर करण्यात आला.

ही लिलाव प्रक्रिया पूर्ण करून 13 जानेवारी 2023 रोजी यशस्वी लिलावधारकांना संबंधित पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.

Goa Mining
Opa Pipeline Leakage: गांजे-उसगावात जलवाहिनी फुटली

आता खात्याच्या वतीने दुसऱ्या पाच खनिज ब्लॉक्सचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. या पाच खनिज ब्लॉक्ससाठी विविध कंपन्यांनी 35 निविदा दस्तऐवज नेले होते. त्यापैकी 11 कंपन्यांनी 24 निविदा सादर केल्या आहेत.

या निविदांचे तांत्रिक दस्तऐवज तपासण्याचे काम सुरू झाले असून ते येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. मुख्य लिलाव 17 एप्रिलपासून सुरू होणार असून 27 एप्रिलला या दुसऱ्या पाच ब्लॉक्सची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com