Foreign Tourists : विदेशी पर्यटकांच्या विरोधातील गुन्हे रोखा! पर्यटन व्यावसायिकांची मागणी

सरकारने पोलिस यंत्रणांना अशा प्रकारचे गुन्हे रोखण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी केली आहे.
Foreign Tourists
Foreign TouristsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism : कोरोना महामारीनंतर आता कुठे पर्यटन उद्योगाची गाडी रुळावर येत आहे. पुन्हा एकदा विदेशी पर्यटक गोव्यात येत आहेत. परंतु जपानी दूतावासाने गोव्यात येणाऱ्या नागरिकांना दलाल आणि फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याची सूचना केल्याचे वाईट परिणाम पर्यटन उद्योगावर होऊ शकतात. (Foreign Tourists in Goa)

सरकारने पोलिस यंत्रणांना अशा प्रकारचे गुन्हे रोखण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी केली आहे.

Foreign Tourists
Save Mahadayi : राज्यभरात दीप जागोर; ‘सेव्ह म्हादई’ चळवळीच्या आवाहनाला प्रतिसाद

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकन नागरिकांशी झालेल्या वाईट वागणुकीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याची छबी मलीन झाली आहे. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर विशेषतः उत्तर गोव्यात मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येतात. या परिसरात मोठ्या संख्येने दलाल, फेरीवाले फिरत असून विदेशी पर्यटकांना ते लक्ष्य करतात.

त्यामुळे निदान या पट्ट्यात पोलिस संख्या वाढवण्याची आवश्‍यकता आहे. तसेच पोलिस यंत्रणा देखील दक्ष असणे गरजेचे आहे. जपानी दूतावासाने केलेली सूचना ही गोव्याच्या पर्यटन उद्योगासाठी मारक आहे. जपानी पर्यटक हे शिस्तबद्ध असून चांगल्या वर्तनासाठी ओळखले जातात.

त्यामुळे त्यांच्या दूतावासाने जेव्हा सूचना जारी केली आहे, म्हणजे सरकारने यासंदर्भात त्वरित पाऊल उचलण्याची आवश्‍यकता आहे, असे मत गोवा प्रवास आणि पर्यटन संघटनेचे (टीटीएजी) अध्यक्ष नीलेश शहा यांनी दै.‘गोमन्तक’शी संवाद साधताना व्यक्त केले.

पर्यटन उद्योगात पोलिस खात्याची भूमिका महत्त्वाची आहे; परंतु गोवा पोलिस याबाबत कमी पडतात, हे स्पष्ट झाले आहे. जपानी दूतावासाने जेव्हा सूचना जारी केली, तेव्हा पोलिस अधीक्षक म्हणतात की, त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याची आवश्‍यकता होती. शिष्टाचारानुसार दूतावास पोलिसांना संपर्क करत नाही, याची जाणीव अधीक्षकांना असली पाहिजे.

आज वाहतूक पोलिस केवळ चलन देण्याचे काम करत आहेत. याचा परिणाम पोलिस खात्यावर झाला असून सरकारने यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे.

अन्यथा याचे वाईट परिणाम पर्यटन उद्योगावर होणार आहेत, असा इशारा टीटीएजीचे माजी अध्यक्ष सावियो मसायस यांनी सरकारला दिला. दै.‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com