GST Collection In Goa: राज्याच्या जीएसटी संकलनात 22 टक्क्यांनी घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या डिसेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनात २२ टक्क्यांनी घट झाली आहे.
GST Collection | GST Collection In Goa
GST Collection | GST Collection In Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या डिसेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनात २२ टक्क्यांनी घट झाली आहे. डिसेंबरमध्ये जीएसटीद्वारे एकूण ४६० कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे. मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये हेच संकलन ५९२ कोटी रुपये इतके होते. केंद्रीय अर्थ खात्याने ही माहिती जाहीर केली आहे.

राज्यात एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान जीएसटी संकलन कमी झाले होते, सप्टेंबर महिन्यात त्यात ३३ टक्के तर ऑक्टोबरमध्ये ३२ टक्के वाढ झाली होती; मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यात पुन्हा घट झाली. राज्यात पर्यटन हंगाम सुरू होताच हे संकलन वाढण्याची अपेक्षा केली जात होती. यानुसार ऑक्टोबर ते मार्च या काळात संकलन वाढण्याची शक्यता होती.

GST Collection | GST Collection In Goa
GPSC Exam Update: GPSC चा मोठा निर्णय! सर्व पदांसाठी एकच सामायिक परीक्षा

देशाचा विचार केल्यास डिसेंबर महिन्यात सलग दहाव्या महिन्यात जीएसटी संकलन १.४ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. यामध्ये सीजीएसटीचा २६,७११ कोटी रुपये, एसजीएसटीचा ३३,३५७ कोटी रुपये, आयजीएसटी ७८, ४३४ कोटी रुपये आणि उपकराच्या माध्यमातून 11, 005 कोटी रूपये महसूल प्राप्त झाला आहे.

GST Collection | GST Collection In Goa
Shree Shantadurga Kunkalikarin : श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणचा जत्रोत्सव उत्साहात; मिरवणुकीने झाली सांगता

डिसेंबर महिन्यात देशाचे जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) करसंकलन दीड लाख कोटी रुपये झाले आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत अडीच टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यातील जीएसटी कर संकलनापेक्षा ही रक्कम १५.२ टक्के जास्त असल्याची आकडेवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज प्रसिद्धी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com