२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

Ganeshotsav 2024: वाळपई व पर्ये मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबीयांना राणे दाम्पत्याने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे
Ganeshotsav 2024: वाळपई व पर्ये मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबीयांना राणे दाम्पत्याने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे
New House By Rane Family | Ganesh Chaturhi 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Festival 2024

वाळपई: सत्तरीतील २१ गरीब कुटुंबीयांसाठी हा गणेशोत्सव अत्यंत खास ठरला आहे. आपल्या नव्या घरात ते पहिल्यांदाच गणेशमूतीची स्थापन करून गणेशोत्सव साजरा करीत आहेत. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे व मंत्री विश्‍वजित राणे यांच्यामुळे हा आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात आला आहे. राणे दाम्पत्याने स्वखर्चाने ही घरे बांधून दिली आहेत.

वाळपई व पर्ये मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबीयांना राणे दाम्पत्याने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. या वर्षी एप्रिल ते जूनच्या दरम्यान २१ नविन घरे स्वखर्चाने बांधून दिली. अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना गरजेनुसार घरे बांधून देण्यात आली.

ऑगस्टमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली. यामुळे अनेकांना मोठा फटका बसला. त्यात कोणाचे छप्पर उडाले तर काहींच्या घरांना तडे गेले. या घरांचे देखील राणे दांपत्याने दुरुस्ती काम करून दिले. तसेच घरे जमीनदोस्त झालेली काही कुटुंबे अत्यंत गरीब होती, त्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. राणे दांपत्याने याची तातडीने दखल घेत स्वखर्चाने नवी घरे उभारून दिली. आज या सर्व घरांत गणरायाचे आगमन होणार आहे, त्यामुळे ही कुटुंबे अत्यंत आनंदी आहेत.

वेळगे येथील बाळकृष्ण म्हाळशेकर हे आपल्या मातीच्या घरात एकटे राहत होते. त्यांना कोणाचाही आधार नाही. त्यात त्यांची मानसिक स्थिती ठिक नसते. ते राहत असलेले मातीचे घर काही दिवसापूर्वी जमीनदोस्त झाले. छपरावरील पत्रे अंगावर पडून तेही जखमी झाले. म्हाळशेकर यांनाही राणे दाम्पत्याने नवे घर बांधून दिले.

तसेच खडकी येथील वैशाली हरिजन या गरीब महिलेला देखील नविन घर बांधून देण्यात आले आहे. तसेच गोलमाळ, वेळगे येथील रुक्मिणी वांतेकर या वृध्द महिलेलाही नवे घर बांधून दिले आहे. नगरगाव येथील ज्ञानेश्वर च्यारी यांचेही मातीचे घर ३ वर्षांपूर्वी कोसळले होते. हे कुटुंब कोसळलेल्या घरामागे उघड्यावर राहत होते, त्यांनाही तातडीने घर बांधून देण्यात आले.

तसेच भुईपाल येथील हेमा शिंदे यांनाही नवे घर बांधून देण्यात आले आहे. आज ही सर्व कुटुंबे आपल्या नव्या घरात गणेशमूर्तीची स्थापना करणार आहेत. या सर्व कुटुंबीयांनी मंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांचे आभार मानले आहेत.

त्या तिघांसाठी आनंदाचा क्षण

शिवाजीनगर, खडकी येथील यशोदा एकनाथ हरिजन ही आपल्या दोन मुलांसह मातीच्या घरात राहत होती. तिचा मोठा मुलगा दिव्यांग असून दुसरा मुलगा शिकत आहे. रोजंदारीवर काम करून ती कुटुंबाचे पोट भरत होती. पावसाळ्यात तिचे घर कोसळले, तिलाही राणे दाम्पत्याने नवे घर बांधून दिले. चतुर्थीच्या आदल्या दिवशी तिने वास्तू पूजा करून नवीन घरात प्रवेश केला. आज तिच्या या नव्या घरात बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे हे कुटुंब अत्यंत आनंदी आहे.

Ganeshotsav 2024: वाळपई व पर्ये मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबीयांना राणे दाम्पत्याने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे
Ganesh Chaturthi 2024: ‘हरित चतुर्थी’ साजरी करा! पीओपीच्‍या मूर्ती, प्‍लास्‍टिक वापर टाळा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पंधरा दिवसांत उभारले घर

गावकरवाडा, पाडेली येथील अश्विनी अजित गावकर ही आपल्या तीन मुलांसह जुन्या मातीच्या घरात राहत होती. तीन मुलांचे पालनपोषण करणे तिच्यासाठी मोठे आव्हानाचे होते, म्हणून तिने आपल्या दोन मुलांना अनाथ आश्रमामध्ये ठेवले आहे. लहान मुलगा तिच्या जवळ राहतो. घर कोसळल्याने या गरीब महिलेवर मोठे संकट कोसळले. आमदार दिव्या राणे यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलत १५ दिवसांच्या आत तिला नवे घर बांधून दिले.

Ganeshotsav 2024: वाळपई व पर्ये मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबीयांना राणे दाम्पत्याने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे
Ganesh Chaturthi 2024: पोर्तुगिजांच्या नजरेस पडू नये म्हणून गोव्यात कागदावर रेखाटले जायचे गणपतीचे चित्र

‘सत्तरीवासीयांना मदत करणे हे माझे कर्तव्य’

सत्तरीत आमची असून येथील प्रत्येक माणसांचे प्रश्न हे आपले आहेत, त्यामुळे ते सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. यंदा पावसामुळे अनेक कुटुंबीयांना मोठा फटका बसला. आम्ही आमच्या परीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. सत्तरीत २१ घरे बांधून देणार असे आश्वासन दिले होते, ते आपण वेळीच पूर्ण केले. नुकतीच सात घरे कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. १५-२० दिवसांत बांधकाम पूर्ण होणे शक्य नव्हते, परंतु या कुटुंबांना आपल्या घरात गणेश चतुर्थी साजरी करता यावी, यासाठी वेळीच या घरांचे काम पूर्ण केले. या कुटुंबीयांचा आनंद पाहून एक वेगळेच समाधान मिळते, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

चतुर्थीपूर्वी सर्व घरांचे काम पूर्ण झाल्याने तसेच ही कुटुंबे आपल्या नव्या घरात गणेशोत्सव साजरा करणार असल्याने मी अत्यानंदित आहे. बाप्पाच्या कृपेने सर्व काही सुरळीत झाले. सर्वांची गणेश चतुर्थी सुख समाधानाची व्हावी हेच श्रीगणेशाकडे आपले मागणे आहे.

डॉ. दिव्या राणे, आमदार, पर्ये

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com