तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

Goa Made Liquor Seized: आंध्र प्रदेश लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान होत आहे.
 Liquor
Liquor Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Made Liquor Seized

तेलंगणा पोलिसांनी 2.07 कोटी रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. शुक्रवारी, 10 मे रोजी मध्यरात्री महबूबनगर जिल्ह्यातील बालानगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई केली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष देण्यासाठी मद्य वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी रॉयल ब्लू, रॉयल क्वीन ब्रँडच्या 48 बॉक्समध्ये ठेवलेल्या 2000 बाटल्या (17000 लिटरपेक्षा जास्त) जप्त केल्या आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मद्याच्या बाटल्या खाताच्या पोत्याखाली लपवण्यात आल्या होत्या.

गोव्यातील जेकब नावाच्या व्यक्तीने अवैध दारू वाहनात भरण्यास मदत केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजमुंद्री, आंध्र प्रदेश येथे मद्याची वाहतूक केली जात होती. आंध्र प्रदेश लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान होत आहे.

 Liquor
UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 28 लाखांचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 28 लाखांचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. यमकनमर्डीजवळ शनिवारी सायंकाळी बेळगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी याप्रकरणी संतोष नारायण हलसे (33, चाकूर, लातूर) आणि सदाशिव नागोबा गिरडे (53, सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे.

या कंटेनरमध्ये 28 लाख 8 हजार रुपयांची एकूण 1,950 दारुचे बॉक्स आढळून आले आहेत. यासह 10 लाख रुपये किमतीचा कंटेनरही पोलिसांनी जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com