Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsDainik Gomantak

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

UP Crime: मुलगी मुलासोबत फिरायला बाहेर पडली मात्र तिच्या घरच्यांनी अपहरणाची तक्रार पोलिस स्थानकात दाखल केली.

Uttar Pradesh Crime News

आपल्या प्रिय व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्यात गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड अशी प्रेमाची गोष्ट असेल तर मग विषय अधिक हार्ड असतोय. पण, या लफड्यात पोलिसांचे लडतर मागं लागल्यास त्यात अडचणी वाढण्याची शक्यता अधिक असते.

अशीच एक घटना लखनऊ येथून समोर आलीय. सलूनमध्ये काम करणाऱ्या तरूणाने गर्लफ्रेन्डचे गोवा फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहा महिने पैशांची बचत केली, पण तरुण पोलिस चौकशीच्या कचाट्यात सापडला आहे.

लखनऊ येथील मोहम्मद अमन गेल्या सहा महिन्यापासून पैशांची बचत करत आहे. गर्लफ्रेन्डचे गोवा फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पैशांची वाचवत होता. पैशांची जुळणी झाल्यानंतर त्याने गर्लफ्रेन्डसोबत गोव्याला जाण्याचे नियोजन केले.

मोहम्मद आणि त्याची गर्लफ्रेन्ड एकाच ठिकाणी राहण्यास आहेत. दोघे एकमेकांवर प्रेम करतात, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

दरम्यान, दोघांचे गोव्याचे जाण्याचे निश्चित झाल्यानंतर अमन याने दिल्ली आणि तिथून गोव्याला जाण्यासाठी फ्लाईट बूक केली. आणि दोघेही घरातून बाहेर पडले.

Uttar Pradesh Crime News
Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

कहाणीमध्ये येथूनच ट्विस्ट सुरु झाला. मुलीच्या घरच्यांनी तिचे अपहरण केल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल केली अन् पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी तपासचक्र फिरवली असता अमनचे डिजिटल पुरावे सापडले. यात त्याने गोव्यासाठी केलेल्या फ्लाईट्स बुकिंगची महिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अखेर दोघांना शनिवारी (दि.११) गोवा विमानतळावर ताब्यात घेतले.

मुलगी स्वत: मुलासोबत गेली होती का तिच्यावर दबाव होता? याबाबत चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com