Year 2023 Eventful for Goa: गोवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते. तथापि, सन 2023 या वर्षात गोव्याने विविध प्रकारच्या इव्हेंट्सचे आयोजन केले. त्यामुळे गोव्याची चर्चा देशात आणि जगभरात झाली.
ते दोन बडे इव्हेंट म्हणजे G-20 च्या बैठका आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन.
बिलावल भुट्टो आले गोव्यात
गोव्यात 2016 मध्ये ब्रिक्स राष्ट्रांची बैठक झाली होती. त्यानंतर सात वर्षांनी राज्यात आंतरराष्ट्रीय राजकीय कार्यक्रम जी-२० आणि एससीओ बैठकीच्या निमित्ताने झाले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे मे २०२३ मध्ये दक्षिण गोवा जिल्ह्यात झालेल्या SCO बैठकीत सहभागी झाले होते. VVIP लोकांमध्ये त्यांचा समावेश होता.
जम्मू-काश्मीरमध्ये पाच जवानांच्या हत्येनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भुट्टो यांचे राज्यात आगमन झाले.
SCO बैठक मात्र चांगली पार पडली आणि त्यानंतर G20 बैठकांची मालिका झाली ज्यात अनेक परदेशी प्रतिनिधी उपस्थित होते. G20 सदस्य देशांनी पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत 'गोवा रोडमॅप' स्वीकारला.
नॅशनल गेम्स, वर्ल्ड बीच प्रो टूर
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये, राज्याने राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले होते ज्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. नॅशनल गेम्सच्या काळातच वर्ल्ड बीच प्रो टूर 2023 स्पर्धा देखील झाली.
राष्ट्रपतींची दौरा
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ऑगस्टमध्ये गोव्यात आल्या होत्या. आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात त्यांनी गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.