साखळीत कॉग्रेसला खिंडार! दादा आमोणकरासंह 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

येत्या निवडणूकीत भाजप 22 अधिक बहुमताने निश्चित निवडून येणार असे उदगार मुख्यमांत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी काढले.
Chief Minister Dr Pramod Sawant & Dada Amonkar
Chief Minister Dr Pramod Sawant & Dada AmonkarDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: साखळी (Sanquelim) हे गोव्यातील (Goa) नंबर एक शहर बनविणे हेच आपले उद्दिष्ट आहे त्यानुसारच साखळीच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. सर्वांनी एकजूटपणे विकासासाठी सहकार्य करा व येत्या निवडणूकीत भाजप 22 अधिक बहुमताने निश्चित निवडून येणार असे उदगार मुख्यमांत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी काढले.

साखळी कॉग्रेसला खिंडार पाडताना कॉग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रवळू उर्फ दादा आमोणकर (Dada Amonkar), युवा कार्यकर्ते सिध्देश रवळू आमोणकर यांनी आपल्या सुमारे दोनशे युवा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.त्याचप्रमाणे साखळीतील उद्योजक भिमराव देसाई, पंकज हजारे व जयेश पटेल यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. साखळी भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सोबत जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, यशवंत माडकर, हरवळे पंचायतीचे सरपंच संजय नाईक, जेष्ठ कार्यकर्ते सुभाष मळीक, महिला कार्यकर्त्या राधिका सातोस्कर, सुविधा पेडणेकर आदिंची उपस्थिती होती.मुख्यमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले प्रत्येकाचे काम, व्यवसायाद्वारे करियर घडविणे हे आपले स्वप्न आहे.

Chief Minister Dr Pramod Sawant & Dada Amonkar
मुरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर विरजण

पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) नेतृत्वावर देशभर विश्वास वाढत असल्यामुळे असंख्य लोक भाजपात येत आहेत.आपल्याला मुख्यमंत्रीपदाची मिळालेल्या संधीमुळे आपण गोवा तसेच साखळी मतदार संघात बदल घढवू शकलो आपल्या कामावर प्रभावित होऊन असंख्य लोक भाजपात प्रवेश करीत आहेत. साखळी येथे जागा कायद्याने विकत घेऊन साई नर्सिंग इन्स्टीट्युट या शैक्षणिक प्रकल्पाची इमारत बांधली जात आहे तर साखळीतील काही लोक या शैक्षणिक प्रकल्पाला विरोध करतात याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली. ज्या प्रकल्पातून आतापर्यंत पाचशे विद्यार्थी शिकून नोकरीला लागले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.

जेष्ठ कॉग्रेस कार्यकर्ते दादा आमोणकर यावेळी बोलताना म्हणाले मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे सर्वसामान्यांसाठी, गरिबांसाठी अहोरात्र कार्य करीत आहेत.सरकारच्या योजना गावागावात घरोघरी पोहचत आहेत त्यामुळेच त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण कॉग्रेस सोडून भाजप प्रवेश करीत आहेत.

Chief Minister Dr Pramod Sawant & Dada Amonkar
वाळपई भागातील रवळनाथ देवस्थान खुले

युवा सामाजिक कार्यकर्ते सिध्देश रवळू आमोणकर यावेळी बोलताना म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आपण खूष होऊन आपल्या असंख्य युवा समर्थकांसह भाजप प्रवेश केला आहे. आपल्या समर्थक युवकांची रोजगार व इतर कामे मुख्यमंत्र्यांनी करावी एवढीच आपली इच्छा आहे. यावेळी भाजप मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ कार्यकर्ते भिमराव देसाई, पंकज हजारे व जयेश पटेल यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम चिमुलकर यांनी केले तर गोपाळ सुर्लकर यांनी आभार प्रदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com