Goa Police: ‘गोमन्तक’मधील वृत्तामुळे पोलिसांचे धाबे दणाणले; विधानसभेतही चर्चा

Goa Police: पोलिसांनी आम्‍ही या दोघांना अटक केलीच नव्‍हती अशी सारवासारव सुरू केली आहे
Goa Police: ‘गोमन्तक’मधील वृत्तामुळे पोलिसांचे धाबे दणाणले; विधानसभेतही चर्चा
Thieve CCTV FootageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: मायणा-कुडतरी पाेलिसांना गुंगारा देऊन कुख्‍यात चोर अनिल विश्‍वकर्मा आणि अनिल लमाणी या दोघांनी पलायन केले, असे सनसनाटी वृत्त दै. ‘गोमन्‍तक’ने आज २३ जुलैच्‍या अंकात प्रसिद्ध केल्‍यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले असून हा विषय आज विधानसभेतही चर्चेत आला. त्‍यानंतर आता पोलिसांनी आम्‍ही या दोघांना अटक केलीच नव्‍हती, अशी सारवासारव सुरू केली आहे.

कोलवा पोलिसांकडून महिलेला मारहाण, त्यानंतर कन्हैयाकुमार मंडळ खून प्रकरण या दोन प्रकरणांत पोलिसांचा हलगर्जीपणा उघड झाल्यानंतर आता मायणा-कुडतरी पोलिसांच्या ताब्यातून दोघा चोरांनी पलायन करण्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पोलिसांनी आता याप्रकरणी चोरी झालेल्या भंगारअड्ड्याच्‍या मालकानेही मायणा-कुडतरी पाेलिसांत रितसर तक्रार दिली नव्‍हती, असे म्हटले आहे. असे जरी असले तरी भंगारअड्ड्याच्‍या मालकाने या दोन्‍ही संशयितांबद्दल पोलिसांना तोंडी माहिती दिली हाेती. या मालकाने ‘गोमन्तक’शी बोलताना काल तशी कबुली दिली होती.

Goa Police: ‘गोमन्तक’मधील वृत्तामुळे पोलिसांचे धाबे दणाणले; विधानसभेतही चर्चा
Goa Crime: चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर दिली तुरी, स्टेशनच्या खिडकीतून काढला पळ

संशयितांविरोधात अनेक गुन्‍हे नोंद

१) ज्या संशयितांनी ही चोरी केली, असा दावा करण्‍यात आलेला आहे ते दोघेही भंगारअड्डेच चालवितात आणि त्‍यांच्‍याविराेधात अन्‍य पोलिस स्‍थानकांतही गुन्‍हे नोंद झाले आहेत. या दोन्‍ही चोरट्यांची छबी त्‍या अड्ड्यातील सीसीटीव्‍हीत कैद झाली होती. या दोन्‍ही संशयितांवर घरफोड्यांचेही गुन्‍हे नोंद असून त्‍यांच्‍या विरोधात फाताेर्डा, मडगाव व फाेंडा पोलिस स्‍थानकांत गुन्‍हे नोंद आहेत. त्‍यासाठी या दोघांना तुरुंगवासही झाला होता.

२) या दोन्‍ही संशयितांना आम्‍ही आणखी एका चोरीच्या प्रकरणाच्‍या तपासासाठी पोलिस स्‍थानकात बोलावून घेतले होते. आणि त्‍यांची चाैकशी पूर्ण झाल्‍यानंतर त्‍यांना परत पाठविले. हा पलायनाचा प्रकार नव्‍हता, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. मात्र, आतील गोटातील माहितीनुसार पोलिसांनी त्या दोघांना आपल्या ताब्यात घेतले होते; पण अटक दाखवली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com