Goa Crime News: धक्कादायक! कुळे रेल्वेस्थानकाजवळ मध्य प्रदेशमधील 2 मुलींवर सामूहिक बलात्कार; छत्तीसगडच्या तिघांना अटक

रेल्वे स्थानकावर कामाला असलेल्या तिघांनी अत्याचार केला
Goa Sexual Assault Case
Goa Sexual Assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: कुळे रेल्वेस्थानकाजवळ मध्य प्रदेशमधील 2 मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोव्यात कामासाठी म्हणून आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर कुळे रेल्वे स्थानकावर कामाला असलेल्या तिघांनी अत्याचार केला. कुळे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे.

Goa Sexual Assault Case
Goa Updates 10 January 2024: कांदोळी हत्या प्रकरणासह मंत्रिमंडळ बैठक, विद्यार्थी निवडणूकीचे आजचे अपडेट

जय सिंग (35), देवलाल आगारिया (22) आणि सना सिंग (24, सर्वजण छत्तीसगड) या तिघांना कुळे पोलिसांनी अटक केली आहे. सोमवार (8 डिसेंबर) रात्री ही घटना घडली.

उपलब्ध माहितीनुसार, या मुली तिघा संशयितांना ओळखत होत्या. त्या कामाच्या शोधात गोव्यात आल्या होत्या. दिवसभरात काम झाल्यानंतर त्यांंना भूक लागली. मुलींंनी संशयितांकडे काही खायला असेल तर देण्यास सांगितले.

तिघांनी त्या मुलींना खायला आणून दिले. ओळखीचा फायदा घेत त्यानंतर तिथेच जवळ असलेल्या पडझड झालेल्या खोलीत ते मुलींना घेऊन गेले आणि त्यांच्यावर सामूहिकरित्या बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर मुलींनी आरडाओरड केल्यानंतर तिघा संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आज तिघांच्या वैद्यकीय चाचणी होणार असून पीडित दोन्ही मुलींची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान, कुळे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com