Goa Updates 10 January 2024: कांदोळी हत्या प्रकरणासह मंत्रिमंडळ बैठक, विद्यार्थी निवडणूकीचे आजचे अपडेट

Goa Breaking News 10 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...
Goa Live Updates 10 January 2024
Goa Live Updates 10 January 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

नामोशी-गिरी येथील सरकारी प्राथमिक शाळेत दोन महिला शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी

नामोशी-गिरी येथील सरकारी प्राथमिक शाळेत दोन महिला शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी. फिर्यादी शिक्षिकेच्या तक्रारीवरुन मुख्याध्यापिकाविरोधात म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल.

स्मार्ट सिटीच्या सल्लागाराने कोट्यवधी रुपये खाल्ले - बाबूश

स्मार्ट सिटीच्या सल्लागाराने कोट्यवधी रुपये खाल्ले, कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे रोजीची डेडलाईन राहणार आहे. यापुढे दरदिवश कामांचा आढावा घेतला जाईल असे मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले.

गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अभाविप विजयी

गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अभाविप विजयी, अध्यक्षपदी अक्षय शेट, सचिवपदी सुदीप नाईक यांची तर सदस्यपदी मनोहर देसाई, शुभम मलिक, आकाश नाईक, सुभेश नाईक-गांवकर, प्रभा नाईक, मयांक प्रभुदेसाई यांची निवड

कांदोळी हत्याप्रकरणातील संशयित सूचना सेठ IPHB मध्ये दाखल

कांदोळीत झालेल्या 4 वर्षीय मुलाच्या हत्येतील संशयित आरोपी सूचना सेठ हिला वैद्यकीय तपासणीसाठी IPHB बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.

दुहेरी नागरिकत्व, पासपोर्टबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरु- सावंत

दुहेरी नागरिकत्व, भारतीय पासपोर्ट आणि ओसीआय कार्ड यावर राज्य सरकार तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच याचा आम्ही भारत सरकारकडे पाठपुरावा करत आहोत अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय.

‘लढा आता कायदेशीर मार्गानेच’; खनिज वाहतुकीविरोधात मये ग्रामस्थ एकवटले

अंतर्गत रस्त्यावरून खनिज वाहतूक नकोच. खनिज वाहतुकीविरोधात कायदेशीर लढा देण्याचा मयेच्या लोकांचा निर्णय. प्रशासकीय यंत्रणांना निवेदन देत आमदारांनाही दिली निवेदनाची प्रत

पुड्या विकण्यापेक्षा तांबडी भाजी विकणं चांगलं!

पुड्या विकण्यापेक्षा तांबडी भाजी विकणं कित्येक पटीने चांगलं! बाबू आजगावकरांचे, 'आजगावकर हे मार्केटमध्ये तांबडी भाजी विकण्याच्या लायकीचे' या प्रवीण आर्लेकरांच्या वक्तव्याला प्रत्यूत्तर.

हिंमत असेल तर 2027 च्या निवडणुकीत माझा सामना करा!

स्मार्ट सिटीवरून माझ्यावर टीका करणाऱ्या टॉम, डिक आणि हॅरीला उत्तरे देण्यासाठी मी इथे नाही. हिंमत असेल तर त्यांनी 2027 च्या निवडणुकीत माझा सामना करावा, असे म्हणत बाबूश मोन्‍सेरात यांची उत्पल पर्रीकरांवर अप्रत्यक्ष टीका. मी इथे निवांत बसलेलो नाही. मला लोकांना होणारा त्रास माहित आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.

शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप!

राज्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार मोफत सोलर पंप. मंत्रिमंडळ बैठकीनंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची घोषणा.

दोन्ही जिल्हा रुग्णालयांमध्ये आता ICU विभाग!

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आझिलो म्हापसा आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हॉस्पिसियो मडगाव येथे आता ICU विभाग सुरू करण्यास सरकारची मान्यता. पूर्णवेळ डॉक्टर मिळेपर्यंत कंत्राटी डॉक्टर आणि नर्सची भरती करण्यात येणार.

भाषा संशोधन केंद्राला मंत्रिमंडळाची मंजुरी!

राज्यात कोंकणी भाषेच्या संशोधन आणि अभ्यासासाठी भाषा संशोधन केंद्राला मंत्रिमंडळाची मंजुरी. या केंद्रासाठी लवकरच जागा भरण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.

मंत्रीमंडळाने जमीन हडप प्रकरणाचा अहवाल स्विकारला!

मंत्रीमंडळ बैठकीत जमीन हडप प्रकरणाचा एसआयटी अहवाल मंत्रीमंडळाने स्विकारला. या अहवालात ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

22 जानेवारीला सरकारी कर्मचारी, शाळांना सुट्टी!

22 जानेवारीला राम मंदीर सोहळ्याच्या निमित्ताने गोव्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर. सर्व शाळांनाही सुट्टी. मुख्यमंत्र्यांकडून घोषणा.

यापुढे गोव्यात सर्व दिव्यांगांना मोफत यंत्रे!

यापुढे गोव्यात जे दिव्यांग लोक आहेत त्यांना जी यंत्रे लागतील ती मोफत देण्यात येतील. गोमेकॉसीत प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र सुरू करण्यात आले आहे. तिथे ही सेवा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.

काँग्रेसतर्फे 'ओपिनियन पोल डे' निमित्त जाहीर सभा

'ओपिनियन पोल डे' साजरा करण्यासाठी काँग्रेसतर्फे 16 जानेवारीला लोहिया मैदानावर जाहीर सभेचे आयोजन. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी गोवेकरांना मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

सांगे पालिकेच्या सभापतीपदी अर्चना गावकर

सांगे नगरपालिकेच्या नवीन सभापतीपदी अर्चना अंकुश गावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पेडणेतील रेती व्यवसायासाठी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

पेडणे भागातील रेती व्यवसाय सुरू करावा यासाठी व्यावसायिकांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांची भेट घेवून मागणी केली. प्रवीण आर्लेकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेवून चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

कुळे येथे दोन मुलींवरसामूहिक अत्याचार; तिघांना अटक

कुळे येथे परराज्यातील दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जय सिंग (35), देवलाल आगारिया (22) आणि सना सिंग (24, सर्वजण छत्तीसगड) या तिघांना अटक. ही घटना सोमवारी 8 जानेवारीला रात्री घडली. काल (9 जानेवारी) संशयित आरोपींना कुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू.

बांधकामासाठीचे सिमेंट ब्लॉक्स पुरवतो सांगून फोंड्यात महिलेची लाखाची फसवणूक

Ponda Fraud News: बांधकामासाठीचे सिमेंट ब्लॉक्स पुरवतो, असे सांगून फोंड्यात एका महिलेला सुमारे लाख रुपयांना गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांत संशयिताविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com