Goa Excise Fraud: अबकारी खात्यातील 2 कोटींचा घोटाळा; अधिकारीही सापडले चौकशीच्या फेऱ्यात

अनेकांचे धाबे दणाणले : चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

Financial fraud
Financial fraudDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Excise Department अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयामधून मद्यविक्री परवान्यांच्या नूतनीकरणातून परवानेधारकांची 2 कोटींची फसवणूक केल्याचा ठपका असलेल्या वरिष्ठ कारकुनासह त्या कार्यालयातील आणखी काही कर्मचारी व अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी दिलेल्या जबानीनुसार या घोटाळ्याच्या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्याने कार्यालयात त्या काळात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अबकारी खात्याकडे सुमारे 70 ते 80 तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारदारांच्या जबान्या नोंदवून हा घोटाळा कशाप्रकारे घडवून आणला, याची माहिती अबकारी खात्याचे अधिकारी मिळवत आहेत. प्रत्येक तक्रारीमधून वेगवेगळी माहिती समोर येत आहे.


Financial fraud
Goa Monsoon: मॉन्सूनच्या पहिल्या 20 दिवसांत गोव्यात 71 टक्के कमी पाऊस

‘त्या’ कारकुनास अटक करा : कॉंग्रेस

अबकारी खात्यातील कथित घोटाळा प्रकरणात बदली केलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यास अटक करण्याची मागणी गुरुवारी काँग्रेसने केली. काँग्रेस नेते संजय बर्डे म्हणाले की, अबकारी आयुक्त नारायण गाड हे सरकारला वाचवत आहेत.

साळगावातील स्मृती इराणी प्रकरणातही ते सरकारच्या बाजूने राहिले. पेडणे तालुक्यातील 80 जणांनी भरलेले पैसे जर सरकारी तिजोरीत गेले नाहीत, तर ते कुठे गेले? एका पेडणे तालुक्यात असा प्रकार असेल तर इतर तालुक्यांत काय घडत असेल, असा प्रश्‍न बर्डे यांनी केला.


Financial fraud
Goa Bank Fraud: नऊ बँकांना तब्बल 'एवढ्या' लाखांचा घातला गंडा; भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

खात्याकडे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परवाने नूतनीकरण शुल्क जमा करण्याची सोय होती. तरीही परवानेधारकांना ऑनलाईन सुविधा सुरळीत नसल्याचे सांगून या कारकुनाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला.

त्याच्या या रॅकेटमध्ये इतर कोण आहेत, याचीही माहिती घेण्यात येत आहे. चौकशी अहवाल समोर आल्यानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई होण्याबरोबरच फौजदारी तक्रारही दाखल होऊ शकते, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

ज्या कारकुनावर या घोटाळ्याचा ठपका ठेवला आहे, त्याला त्वरित निलंबित न करता त्याची बदली केली आहे. परवानेधारकांनी त्या कारकुनाचे नाव घेतले असल्याने त्याच्यावर त्वरित कारवाई होण्याची गरज होती.

मात्र, त्याला वजनदार राजकारण्याचा आशीर्वाद असल्याने अबकारी आयुक्तही काही करू शकले नाहीत. हे प्रकरण दडपण्यासाठी व कारकुनावर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com