Margao: ‘त्या’ धोकादायक इमारतींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

Dangerous Buildings In Margao: १९ धोकादायक इमारती अजून अस्तित्वात; पालिकेकडून कारवाई नाहीच
Dangerous Buildings In Margao: १९ धोकादायक इमारती अजून अस्तित्वात; पालिकेकडून कारवाई नाहीच
Dangerous Buildings In MargaoDainik Gomanatk
Published on
Updated on

मडगाव: मडगाव नगरपालिका क्षेत्रात एकूण २० जुन्या इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत. त्यातील एक इमारत पाडली गेल्याने आता १९ इमारती अजून अस्तित्वात आहेत. या इमारती लोकांसाठी घातक ठरू शकतात, याची जाणीव असतानाही मडगाव पालिका आणि इतर प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणेच पसंत करत आहे.

पालिकेने यातील १९ इमारतींना नोटिसा पाठविल्या आहेत, तर एक इमारत पाडण्यात आली असल्याची माहिती नगरपालिकेच्या तांत्रिक विभागातून प्राप्त झाली आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, ठिकठिकाणी जुनी घरे आणि इमारतींचे काही भाग कोसळत असल्याचे दिसत आहे. मात्र, पालिका फक्त नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यातच धन्यता मानत आहे.

रविवारी अशाच मुसळधार पावसामुळे पाजीफोंड येथे एक संरक्षक भिंत खचली. त्याच्या काही दिवस अगोदर पणजी येथील एका जुनी इमारतीचा काही भाग कोसळला आणि नंतर ती धोकादायक इमारतच पाडण्यात आली होती.

आता मडगाव नगरपालिकेने आपल्या क्षेत्रात एकूण २० अशा जुन्या इमारतींना धोकादायक ठरवले आहे.

याविषयी नगरपालिकेच्या तांत्रिक अभियंत्यांकडून विभागातील मिळालेल्या माहितीनुसार, ज्या इमारती धोकादायक आहेत, त्या कधीही कोसळू शकतात. त्या सर्व इमारतींपैकी गांधीनगर येथील एक इमारत नुकतीच जमीनदोस्त करण्यात आली असून, उर्वरित १९ जुन्या इमारतींच्या मालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला पाहिजे

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले की, नगरपालिकेने आधीच काही धोकादायक इमारती आहेत, त्या वेळीच पाडणे अनिवार्य आहे, त्यांची ओळख पटवून नोंद केली आहे. त्या खासगी इमारती पाडणे नगरपालिकेच्या हातात नसून त्या इमारती त्यांच्या मालकांनी पाडल्या पाहिजेत.

संबंधित मालकांना त्या धोकादायक इमारती पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला पाहिजे. त्यानंतरच नगरपालिका पुढील कारवाई करून त्या धोकादायक इमारती पाडू शकते. आम्ही या धोकादायक इमारतींची यादी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे.

Dangerous Buildings In Margao: १९ धोकादायक इमारती अजून अस्तित्वात; पालिकेकडून कारवाई नाहीच
Margao Municipal Council: कचरा टाकायचा कुठे? नगरपालिकेसमोर मोठा प्रश्न

खात्री करूनच निर्णय

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांच्याशी संपर्क साधला असता, पालिकेकडून धोकादायक इमारतींची यादी आली तर पाहणी करून खात्री करणार आहोत. पुढे इमारती पाडण्याचा आदेश देण्याच्या निर्णयावर विचार करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com