Ulhas Tuenkar: नावेलीत वर्षभऱात 18 कोटींची विकासकामे मार्गी

नावेली मतदारसंघात मागच्या वर्षभरात 18 कोटी रुपये खर्चाची विविध विकासकामे मार्गी लागली आहेत
Ulhas Tuenkar
Ulhas TuenkarDainik Gomantak
Published on
Updated on

नावेली मतदारसंघात मागच्या वर्षभरात 18 कोटी रुपये खर्चाची विविध विकासकामे मार्गी लागली असून यापैकी 8 कोटी रुपये खर्चाची कामे एकतर पूर्ण झाली आहेत किवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. 10 कोटी खर्चाच्या विकासकामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ही विकासकामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी दिली.

Ulhas Tuenkar
Quepem Panchayat Election: केपे तालुक्यातील पंचायत पोटनिवडणुकीत एल्टन डिकॉस्ता यांचे उमेदवार विजयी

निवारा शेड, साकव, नाले, रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यांचे हाॅटमिस्किंग, संरक्षक भिंती, तळावली - वार्का पुलाची व पदपथाची दुरुस्ती, रावणफोंड जंक्शन ते रावोरापर्यंत नवीन जलवाहिनी अशा विकासकामांचा यात समावेश आहे. सर्व मिळून 29 विकासकामे मार्गी लागणार असून त्यामुळे नावेली मतदारसंघातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत, असे तुयेकर यांनी सांगितले.

दिकरपाल दवर्ली पंचायत क्षेत्रातील होली क्राॅस येथील शेड व फरशा, रावणफोंड येथे नाल्याचे बांधकाम, मड्डी - मांडप येथे गटार दुरुस्ती रुमडामळ दवर्लीच्या प्रभाग 2 मधील गटारांची दुरुस्ती व रस्ता रुंदीकरण. झरीवाडा येथील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व गटारांचे बांधकाम आदी कामे पूर्ण झाली आहेत, तर रावणफोंड येथे सैनिक प्रशिक्षण केंद्राजवळ साकव, बेले येथे रस्ता दुरुस्ती, दवर्ली - चांदर मार्गावर विभाजकांची दुरुस्ती आदी कामे सध्या सुरु आहेत. दिकरपाल दवर्ली व रुमडामळ दवर्ली पंचायत क्षेत्रातील रस्त्यांच्या हाॅट मिक्सिंगचे कामही सुरु आहे, अशी माहीती तुयेकर यांनी दिली.

मड्डी - मांडप, रावणफोंड, दवर्ली येथे नाल्याची दुरुस्ती व बांधकाम, तसेच काही ठिकाणी नाला उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रावणफोंड जंक्शन ते रावोरापर्यंतची जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे या भागातील नागरिकांची पाणी पुरवठ्याची समस्या दूर होणार आहे. या कामाची 5 कोटी 27 लाख रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे, असे तुयेकर यांनी सांगितले.

वासुदेव नगर, दवर्ली मशीद, महालक्ष्मी साॅ मिल, विल्सन नगर - रुमडामळ, बोबटेवाडा, तळेबांद, सैनिक प्रशिक्षण केंद्र परिसर, पटिदार भवन, बागा, बेले या ठिकाणी रस्ता, गटार दुरुस्ती, संरक्षक भिंत अशी विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती तुयेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com