Independence Day 2023: दिल्ली ते गोवा; 77व्या स्वातंत्र्यदिनाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

77 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे सर्व अपडेट्स
Independence Day 2023 Live Updates
Independence Day 2023 Live UpdatesDainik Gomantak

गोव्यातील राजकीय पुढारी ध्वजारोहण करताना...पहा फोटो

Cm Pramod Sawant
Cm Pramod SawantDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Governor P.S. Sreedharan Pillai
Governor P.S. Sreedharan PillaiDainik Gomantak

गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई

Vishwajit Rane and Deviya Rane
Vishwajit Rane and Deviya RaneDainik Gomantak

वनमंत्री विश्वजित राणे आणि पर्ये आमदार देविया राणे

Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

पर्यटनमंत्री रोहन खवंटे

Mauvin Gudinho
Mauvin GudinhoDainik Gomantak

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो

Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak

सभापती रमेश तवडकर

Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak

वीजमंत्री सुदिन ढवळीकर

Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल

Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak

कृषिमंत्री रवी नाईक

भारतीय स्वातंत्र्यदिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या खास शुभेच्छा...

French President Emmanuel Macron
French President Emmanuel Macron Dainik Gomantak

स्वातंत्र्यदिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. खास ट्विट करत त्यांनी फ्रान्स आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांना मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले की, स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय जनतेचे अभिनंदन! एक महिन्यापूर्वी पॅरिसमध्ये, माझे मित्र नरेंद्र मोदी आणि मी भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्ष 2047 पर्यंतच्या नवीन इंडो-फ्रेंच महत्त्वाकांक्षा आखल्या आहेत. भारत हा फ्रान्सवर नेहमीच विश्वासू मित्र आणि भागीदार म्हणून विश्वास ठेवू शकतो.”

ट्विट पहा :

तिरंग्याच्या रूपात हरवळे धबधब्याचे नयनरम्य दृश्य!

स्वातंत्र्यदिनानिमित्त अंजुणे धरणाचे विलोभनीय तिरंगी रूप...

77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे...

Cm Pramod Sawant
Cm Pramod SawantDainik Gomantak

“येत्या काही वर्षांत भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल": पंतप्रधान

PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

भारतीय हवाई दलाचे मुख्यालय 'वायु भवन' तिरंग्यात उजळून निघाले....पहा हे लक्षवेधी फोटो

'माझी बस' योजना वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणेल... 

राज्यातील अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सरकारतर्फे 'माझी बस' योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना गोव्यातील वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. याबाबत त्यांनी राज्यातील सर्व खाजगी बस मालकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पुढील स्वातंत्र्यदिनापर्यंत पणजी 'सोलर सिटी' करणार 

राज्यात अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर आहे. राजधानी पणजीचे 'सोलर सिटी'मध्ये रूपांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व पणजीकरांनी सरकारला मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

19 डिसेंबर 2023 पर्यंत उरलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकरी देणार : मुख्यमंत्री

गोवा स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून रखडला आहे. मध्यंतरी त्यापैकी 42 जणांना नोकरी देण्यात आली असून उरलेल्या सर्व जणांना येत्या 19 डिसेंबरपर्यंत नोकरी देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

65 होमगार्डना पोलीस भरतीची संधी

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून होमगार्ड सरकारच्या सेवेत रुजू आहेत. पण त्यांना बऱ्याचदा मानाचे स्थान मिळत नाही. यासाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून 65 होमगार्ड पोलीस भारती होण्याची संधी देण्यात येणार आहे.

पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावला.

Tourism Minister Rohan Khaunte
Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मांडवी नदीच्या तीरावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Live 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 7 महत्वाचे मुद्दे

1. जगाला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास

जेव्हा जग संकटात होते. जग वाईट अवस्थेतून जात होते तेव्हा भारताने या संकटावर मात करण्यासाठी योग्य पाऊले उचलली आणि संपूर्ण जगात विश्वास निर्माण केला

2. माझा युवाशक्तीवर विश्वास

देशाच्या विकासात शेतकरी, मजूर आणि श्रमिकांचा मोठा आहे. त्याचबरोबर विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील भारताने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टार्टअप उद्योगात देश अग्रेसर असून ही भारताची शक्ती आहे. माझा युवाशक्तीवर विश्वास असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

3. राष्ट्र प्रथम हाच आमचा मूलमंत्र

सर्व गोष्टींच्या आधी देश प्रथम आहे. आधी देश येतो मग बाकी सगळे येते आणि हाच आमचा मूलमंत्र असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

4. कोरोनाने जगाला मानवी संवेदना ओळखायला शिकवले

कोरोनाने संपूर्ण जगाला माणसाला जास्त महत्व द्यायला शिकवले, मानवी संवेदना महत्वाच्या असतात हे कोरोणाच्या काळात माणूस शिकला. कोरोनातून बाहेर येण्यासाठी भारताने जगाला मदत केली आणि भारताची एक वेगळी बाजू जगासमोर आणली

5. भारत जगातील 3 री अर्थव्यवस्था होणार

जगातील अनेक देशांना महागाईचा अनेक देशांचा फटका बसला आहे. भारत या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे पण लवकरच भारत जगातील 3 री अर्थव्यवस्था होणार असे आश्वासन नरेंद्र मोदींनी जगाला दिले आहे.

6. 2014 मध्ये देशाला मजबूत सरकार मिळाले

2014, 2019 मध्ये देशाला मजबूत सरकार मिळाले आहे. देशात आमचे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. विकास करण्याचा प्रयत्न हे सरकार सातत्याने करत आहे. देशा सहकार क्षेत्राला बळ देण्यासाठी मंत्रालय तयार केले आहे. ८ कोटी लोकांनी देशात नवीन उद्योग सुरु केले .

7. देशाला G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रीय चेतना हा असा शब्द आहे, जो चिंतामुक्त आहे. आज ती राष्ट्रीय जाणीव सिद्ध करत आहे. आमचा जनतेवर विश्वास आहे, जनतेचा सरकार आणि देशावर विश्वास आहे. हा विश्वास आपल्या धोरणांचा, आपल्या चालीरीतींचा आहे.

देशाला G-20 शिखर परिषद आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. G-20 चे अनेक कार्यक्रम भारताच्या कानाकोपऱ्यात झाले आहेत. देशाच्या विविधतेची ओळख जगाला करून दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींचे भाषण LIVE

77 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी गुगलचे खास डूडल!

Independence Day 2023 Google Doodle
Independence Day 2023 Google DoodleDainik Gomantak

नवी दिल्लीस्थित कलाकार नम्रता कुमार यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनासाठी एक Google डूडल तयार केले आहे जे देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कापड परंपरांचा उत्सव साजरा करते. 1947 मध्ये या दिवशी ब्रिटीश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाल्यामुळे एका नवीन युगाची सुरुवात झाली होती.

देशाच्या विविध भागांतील कापड, डूडलमध्ये दाखवले गेले आहेत. कुशल कारागीर, शेती करणारे, विणकर, रंगरंगोटी, प्रिंटर आणि भरतकाम करणाऱ्यांच्या सामूहिक कारागिरींचा सन्मान करण्यात येत आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com