Mapusa : शर्वाणी देवीचा 14 पासून वर्धापनदिन उत्सव

17 रोजी, सकाळी 8 वा. प्राकारशुद्धी, दत्तयाग, सत्पुरुष व इतर धार्मिक विधी, महाआरती, महाप्रसाद.
शर्वाणी देवी
शर्वाणी देवीDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा : अडवलपाल येथील श्री देवी शर्वाणी, महादेव, गणपती, बाळवंस, पेटकर कुलपुरुष, बाप ब्राह्मण वैगेरे देवतांचा वर्धापनदिन 14 एप्रिलपासून धार्मिक विधीनुसार साजरा करण्यात येणार आहे.

राजेश प्रभाकर साळगावकर (मुंबई) यांना शतचंडी महात्सवाचे यजमानपद लाभले आहे. 14 एप्रिल रोजी शर्वाणी देवीच्या मुळस्थानी यजमान गुरुदास सावळो साळगावकर यांच्या हस्ते लघुरुद्रभिषेक, आरती व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी अडवलपाल येथे 5 वा. प्रायश्चित विधी, देवता प्रार्थना, संकल्प गणपतीपूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृकापूजन देवनांदी श्राद्ध, आचार्यादिवरण होईल.

शर्वाणी देवी
Goa Saras Festival 2023 : सरस’मध्ये बेकायदा व्यवहार नकोच

15 रोजी, सकाळी 8.30 वा. प्राकारशुद्धी, शतचंडी जप, गणेशयाग, मुळपुरुष ब्राह्मण, पावेकारी रवळनाथ लघुरुद्रभिषेक, हनुमान लघुरुद्र, कुंकूमार्चन व सायं. 5 वा. भाविकांसाठी सत्यमारुती पूजा. सत्यमारुती पूजेसाठी इच्छुकांनी कार्यकारिणीशी संपर्क साधावा. 16 रोजी, सकाळी 8 वा. स्थळशुद्धी, शतचंडी जप, वेताळ महारुद्र, लघुरुद्रजप, व इतर विधी, रात्री 9 वा. आजगावकर दशावतारी नाट्यप्रयोग. 17 रोजी, सकाळी 8 वा. प्राकारशुद्धी, दत्तयाग, सत्पुरुष व इतर धार्मिक विधी, महाआरती, महाप्रसाद. सायंकाळी पेटकर कुलपुरुषाकडे कौल व रात्री देवीची रथप्रदक्षिणा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tarun Tejpal Life in Colvale Jail
Goa Dairy management takeover by NDDB
Victim Compensation Scheme
Mahadev Shinde National Teacher Award 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com