Goa Saras Festival 2023 : सरस’मध्ये बेकायदा व्यवहार नकोच

मंत्री गोविंद गावडे : बारा दिवसांत एक कोटी ८० लाख रुपयांची उलाढाल
Govind Gaude
Govind GaudeGomantak Digital Team
Published on
Updated on

Goa Saras Festival 2023 in Margao: मडगावमधील गोवा सरस २०२३ प्रदर्शना दरम्यान एका स्टॉलवाल्याने बेकायदेशीर व खोटारडा व्यवहार केला, ही बाब दुर्दैवी आहे.

भविष्यात अशा प्रकारांना ‘सरस’ तसेच ‘लोकोत्सव’ प्रदर्शनांमध्ये थारा नसेल. अशा चुका पुन्हा घडणार नाहीत, यासाठी या प्रकाराकडे कडक नजर ठेवली जाईल.

तसेच या घटनेची चौकशी केली जाईल व या स्टॉलवाल्याला अन्य कुठल्याही प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यापासून बंदी घातली जाईल, असे ग्रामीण विकास तसेच कला संस्कृती व क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी गोवा सरस २०२३ च्या समारोह सोहळा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

या एका घटनेने गोव्याच्या प्रतिमेला कलंक लागला आहे, असे आपण मानतो. सरस किंवा लोकोत्सव प्रदर्शनांमध्ये केवळ कारागिरांनी तयार केलेली उत्पादनेच तसेच महिला किंवा इतर स्थानिक बचत गटाने तयार केलेले खाद्य पदार्थच प्रदर्शित करण्यासाठी व त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीच अशा प्रदर्शनांचा मुख्य उद्देश असल्याचेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

Govind Gaude
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत घट; जाणून घ्या आजचे दर...

यापुढे फेब्रुवारी महिन्या आधीच सरस प्रदर्शनाचे आयोजन केले जाईल. राष्ट्रीय सरस प्रदर्शनातही गोव्यातील महिला बचत गटांनी भाग घ्यावा व सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बारा दिवसात गायन, वेशभूषा. नृत्य, फॅशन शो स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रमुख पाहुण्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

स्टॉल्स

एकूण स्टॉल-223

बचत गट- 115

इतर राज्य बचत गट - 52

कारागिरांसाठी -56

2013- 1.80 कोटी

2021- 1.17 कोटी

राज्यांतील विक्रेत्यांचा सहभाग -16

खुल्या जागेत स्टॉल्स -11

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com