Mapusa News: विहिरीत पडलेल्या 14 वर्षीय युवतीचा अग्निशामक दलाने वाचवला जीव; धुळेर येथील घटना

जवानांनी रोपच्या सहाय्याने तरुणीला सुखरुपपणे विहिरीच्या बाहेर काढले
Girl rescued alive by Mapusa fire station Crew
Girl rescued alive by Mapusa fire station Crew Dainik Gomantak
Published on
Updated on

Girl Rescued Alive By Mapusa Fire Station Crew: धुळेर म्हापसा येथे विहिरीत पडलेल्या 14 वर्षीय तरुणीला वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले. जवानांनी मोहिम राबवित रोपच्या सहाय्याने तरुणीला सुखरुपपणे विहिरीच्या बाहेर काढले. ही घटना शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

Girl rescued alive by Mapusa fire station Crew
Chairperson Damodar shirodkar: मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचा राजीनामा देण्याचा इशारा

म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाला धुळेर येथील बागायतदारच्या मागील बाजूस असलेल्या विहरीत युवती पडल्याचा कॉल आला.

अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत 45 फूट खोल विहीरीत बचाव मोहिम राबवीत 14 वर्षीय युवतीला वाचविण्यात यश आले. 20 फूट पाण्याची पातळी असलेल्या या विहिरीत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करीत अग्निशमन दलाचे जवान प्रवीण गावकर यांनी विहिरीत उतरून तरुणीला वाचवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com