Chairperson Damodar shirodkar: मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचा राजीनामा देण्याचा इशारा

शिरोडकर व दिगंबर कामत यांच्यातील संबंध ताणले
Chairperson Damodar shirodkar
Chairperson Damodar shirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipal Council: मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपण नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची घोषणा शिरोडकर यांनी केली आहे.

Chairperson Damodar shirodkar
गोवा कॅबिनेट मंत्र्याचा सेक्स स्कँडल, अपहरणात समावेश? पंच महिलेशी चाळे, चोडणकरांनी शेअर केली खळबळजनक बातमी

मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या दामोदर शिरोडकरांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान शिरोडकर यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे.

याबाबत शिरोडकर यांना विचारले असता सांगितले की, "आपण नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. आज शनिवार असल्याने मी माझा राजीनामा पालिका प्रशासन संचालकाकडे देऊ शकलो नाही. सोमवारी मी माझा राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे" असे शिरोडकर यांनी गोमन्तकशी बोलताना सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
drunk beggars creating nuisance in Margao
 Margao Jewelers Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com