बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक कोसळला दरीत

गोव्यातील चोर्ला घाट परिसर धोकादायक
बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक कोसळला दरीत
बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक कोसळला दरीतDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : गोव्यातील चोर्ला घाट (Chorla Ghat) परिसर धोकादायक बनू लागला आहे. रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहनांचे सातत्याने अपघात (Accident) होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दोन दिवसा आधी रात्री बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक सरळ दरीत कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकाराची जीवित हानी झाली नाही.

बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक कोसळला दरीत
Goa Rain Updates: राज्यात आजपासून पावसाची विश्रांती

समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देत असताना हा भीषण अपघात घडला. त्या ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी घेतल्यामुळे त्याला रात्रीचा रस्त्याचा अंदाज आला नाही आणि वाहन रस्त्यावरून सुमारे वीस मीटर खाली कोसळले. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक चालक व इतरांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला, अन्यथा या अपघातात मोठा अनर्थ घडला असता.

बेळगावहून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक कोसळला दरीत
अमित पालेकर यांची प्रकृती खालावली

त्या अवजड ट्रकमध्ये औद्योगिक वसाहतीमधील एका फॅक्टरीचे सामान होते. या अपघातात सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त किमतीच्या सामानाचे नुकसान झाले. दरम्यान, यावर्षी पावसाळ्यात अनेकवेळा घाटात दरडी कोसळल्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून रस्त्यावरील माती काढून बाजूला टाकण्यात आली होती. मात्र उर्वरित माती अजूनही रस्त्यावरच आहे. आणि त्या मातीवरून वाहने घसरुन अपगात वाढत आहे. यामुळे रात्री-अपरात्री या घाटात वाहन चालवतांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने जबाबदारी घेवून या रस्त्यावरील ही माती हटविणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com