14 घरे अजूनही मोपाच्याच नावे!

विमानतळ प्रकल्पग्रस्त: विस्थापित धनगर कुटुंबांची व्यथा
14 houses
14 housesDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मोपा आंतरराष्ट्रीय 13 व्या हरित विमानतळ क्षेत्रातील 14 धनगर कुटुंबांना जीएमआर कंपनीने बांधून दिलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय ही घरे अजूनही 14 धनगर कुटुंबांच्या नावावर झालेली नसून आजही विमानतळ प्राधिकरणाच्या नावे विजेची बिले येतात.

14 कुटुंबांना विमानतळ प्राधिकरणाने 100 चौमी जागेत घरे बांधून दिलेली आहेत. मात्र, या कुटुंबांना ही घराची जागा कमी पडते. पूर्वी त्यांची घरे मोपा पठारावर होती, ती घरे विस्तारित होती . मात्र, नवीन घर अपुरे आणि अडचणीचे ठरत आहे. कॉंक्रिट गळत असल्याच्या वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तक्रारी केल्यास मंत्री आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून नाहक बोलणी खावी लागतात, असेही सांगण्यात आले.

14 houses
ताळगावात आजपासून फर्निचर फेअरचे आयोजन

14 धनगर कुटुंबांसाठी प्रत्येकी एक हजार चौरस मीटर जागा द्यावी,अशा आशयाचे पत्र 17 डिसेंबर 2015 रोजी नागरी उड्डाण विभागाचे संचालक डॉ.एस. शानबाग यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना प्रत्येकी 800 चौरस मीटर जागा, त्यात 100 मीटर जागेत घर व 50 मीटर जागेत गोठा बांधून दिला.परिणामी लेखी कराराचा सरकारकडूनच भंग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

निकृष्ट बांधकामाबाबत ठेकेदाराची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी धनगर समाजाने केली आहे. धनगर कुटुंबांची 2018 साली मूळ घरे ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने देवस्थानची कासारवर्णे येथील 36,800 चौमी.भूखंड 5 कोटी 83 लाख रुपये खर्चून संपादित केली.

14 houses
मित्राच्या खून प्रकरणातून गोव्यातील 'त्या' दोघांची निर्दोष मुक्तता

कुटुंब मोठे, छोटेखानी घरात रहायचे कसे ?

आमच्या एकेका कुटुंबात 12 ते 15 सदस्य आहेत,सर्वजण छोटेखानी घरात कसे राहायचे, आमच्यातील काहीजणांना गोठ्यात राहण्याशिवाय पर्याय नाही.

तळकटकर, साळगावकर कुटुंबांची व्यथा

विमानतळ प्रकल्पक्षेत्रात असलेली तळकटकर व साळगावकर कुटुंबांची दोन घरे बेकायदेशीर ठरवून पाडण्यात आली होती.या घटनेला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजूनही सरकारने घेतलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com