Goa Finance Fraud: 130 कोटींच्या फसवणूक प्रकरणाचा आता क्राईम ब्रांच करणार तपास; राजकीय कनेक्शनमुळे घेतला निर्णय

Goa Crime Branch: शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीद्वारे भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी गोव्यातील सुमारे 50 गुंतवणूकदारांना 130 कोटींचा गंडा घातला.
Goa Finance Fraud: 130 कोटींच्या फसवणूक प्रकरणाचा आता क्राईम ब्रांच करणार तपास; राजकीय कनेक्शनमुळे घेतला निर्णय!
Goa Finance FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीद्वारे भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी गोव्यातील सुमारे 50 गुंतवणूकदारांना 130 कोटींचा गंडा घातला. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे कक्षाकडून क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेला मुद्देमाल तसेच दस्तावेज त्वरित क्राईम ब्रांचकडे देण्याचा आदेश पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी काढला.

लुकआऊट नोटीस

दरम्यान, या प्रकरणातील सात संशयित फरारी असून त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढण्यात येऊन त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या आयडिलीक कंपनीचे संचालक असलेले संशयित हे एका आमदाराचे निकटवर्तीय असल्याने हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे देण्याचा निर्णय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

संशयित मायरनविरुद्ध पोलिसांनी यापूर्वीच लुकआऊट तसेच ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे व रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. तो दुबईत (Dubai) पळाल्याने त्याचा शोध व अटक करण्यासाठी इंटरपोल यंत्रणेची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Goa Finance Fraud: 130 कोटींच्या फसवणूक प्रकरणाचा आता क्राईम ब्रांच करणार तपास; राजकीय कनेक्शनमुळे घेतला निर्णय!
Cash For Job Scam: ''गोवा आता घोटाळ्याची भूमी म्हणून देशभर नावारुपास आलाय'', कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन पालेकर बरसले

सर्वात मोठा घोटाळा!

मुख्य सूत्रधार मायरन रॉड्रिग्स आणि दीपाली परब हे आयडीलिक गोवन गेटवेज कंपनीमध्ये भागीदार असल्याने कंपनीच्या सात संचालकांविरुद्ध 130 कोटींचा फसवणुकीचा गुन्हा ‘आर्थिक गुन्हे कक्षा’च्या पोलिसांनी (ईओसी) दाखल केला आहे. कॅश फॉर जॉब प्रकरण ताजे असतानाच शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुतंवणुकीद्वारे भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com