कोलवा किनारा पुन्हा गजबजला व्यावसायिकांत समाधान

वॉटर स्पोर्टस् बोट मालक पेले फर्नांडिस यांनी सांगितले, की पर्यटक येत असले तरी या व्यवसायाला अजून तेजी आलेली नाही
Colva Beach

Colva Beach

Dainik gomantak

गोव्यातील समुद्र किनारे देशी पर्यटकांनी परत फुलू लागले असून शेजारील व अन्य राज्यातील पर्यटकांचे लोंढे जगात प्रसिद्ध असलेल्या कोलवा समुद्र (Colva Beach) किनाऱ्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे येथील व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

मार्च 2020 मध्ये कोरोना संसर्गाचे आगमन झाल्यानंतर देशी व विदेशी पर्यटकांना गोव्यात (goa) येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. हॉटेल, टुरिस्ट टॅक्सी, शॅक, वॉटर बोट स्पोर्ट व अन्य व्यवसाय (Business) पूर्णपणे ठप्प झाला होता. तब्बल दीड वर्षानंतर हा व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी ही समाधान व्यक्त केले आहे.

<div class="paragraphs"><p>Colva Beach</p></div>
महिलांच्या सबलीकरणासाठी झटले पाहिजे: भार्गवी चिरमुले

टुरिस्ट टॅक्सीने भाडे मारणारे मिनीन डायस याने सांगितले, की रेल्वे व हवाईमार्गे येणारे पर्यटक गोवा फिरण्यासाठी टुरिस्ट टॅक्सीचा उपयोग करीत असत आणि या ठिकाणी त्यांची भाडी मिळण्यास सुरवात झाली आहे.

येथील निवासी हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार, काही खोल्यांचे बुकिंग सुरु झाले आहे. यापुढे ख्रिसमसचा सण आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भर पडणार आहे. वॉटर स्पोर्टस् बोट मालक पेले फर्नांडिस यांनी सांगितले, की पर्यटक येत असले तरी या व्यवसायाला अजून तेजी आलेली नाही.

<div class="paragraphs"><p>Colva Beach</p></div>
वेश्‍‍याव्‍यवसायाचा पर्दाफाश,गोव्यात क्राईम ब्रँचची कारवाई..

शॅकमालक रायन यांनीही काही प्रमाणात पर्यटक येथे दाखल झाले असल्याचे सांगितले. मात्र, आमचा व्यवसाय विदेशी पर्यटकांवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले. कोलवा येथील व्यवसायाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ यांसह इतर राज्यांतील पर्यटक येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे समाधानकारक व्यवसायही होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com