Goa GI Tag: १३ गोमंतकीय उत्पादनांना मिळणार ‘जीआय’

Geographical Indication: जीआय नोंदणी कोणत्याही उल्लंघनाच्या बाबतीत उत्पादनाला कायदेशीर संरक्षण देते
Geographical Indication: जीआय नोंदणी कोणत्याही उल्लंघनाच्या बाबतीत उत्पादनाला कायदेशीर संरक्षण देते
GI tagsiasat.com
Published on
Updated on

पणजी: कुठल्याही उत्पादनाला जीआय टॅग मिळाल्यावर उत्पादकांच्या समुदायाला त्यांची उत्पादने बाजारपेठेतील इतर प्रतिस्पर्धी उत्पादकांपेक्षा वेगळी करण्यास आणि त्यांच्या उत्पादनांभोवती उच्च मूल्य आकर्षित करण्यासाठी मदत करते. तसेच जीआय नोंदणी कोणत्याही उल्लंघनाच्या बाबतीत उत्पादनाला कायदेशीर संरक्षण देते. गेल्या एका वर्षात ५ गोव्यातील उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे तर अजून १३ गोमंतकीय उत्पादनांना जीआय टॅग मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, बौद्धिक संपदा अधिकार अंतर्गत भौगोलिक संकेत (जीआय) हे एक महत्त्वाचे साधन आहे. चेन्नई येथे केंद्र सरकारचे जीआय रजिस्ट्री कार्यालय आहे आणि जीआय दाव्यांच्या प्रस्तावांची तपासणी करण्याचा आणि जीआय प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार या विभागाकडे आहे.

गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात गोव्यातील पाच उत्पादनांना जीआय टॅग देण्यात आला आहे. यामध्ये गोवा काजू, गोवा मानकुराद, आगशीची वांगी, सात शिरी भेंडी आणि गोवा बिबिंका यांचा समावेश आहे.

Geographical Indication: जीआय नोंदणी कोणत्याही उल्लंघनाच्या बाबतीत उत्पादनाला कायदेशीर संरक्षण देते
GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

जीआय टॅगच्या प्रक्रियेत असलेली उत्पादने

१) गोवा मंघिल्लार मँगो, २) कोर्गुट तांदूळ, ३) गोवा मुस्सरत मँगो, ४) ताळगाव ब्रिंजल, ५) गोवा काजू (नट आणि ॲपल), ६) गोवा कोकोनट आणि शेल आयटेम, ७) गोवा हुर्राक, ८) गोवा घुमट, ९) गोवा सौसेजस, १०) कोकोनट फेणी, ११) गोवा कुणबी साडी आणि फॅब्रिक, १२) गोवा स्वीट दोदोल, १३) गोवा कावी कला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com