Maths
Maths Dainik Gomantak

Goa: बारावीत गणित विषयाच्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली, अभियांत्रिकी प्रवेशावर परिणाम

Published on

सासष्टी: खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्याला शिक्षकांची दर्जाहीनता कारण आहे असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात बारावीत गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी (Engineering) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होत असल्याचे प्रतिपादन डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Don Bosco) प्राचार्य डॉ. नीना पाणंदीकर, रायेश्र्वर महाविद्यालय (शिरोडा)चे प्राचार्य डॉ. शैलेंद्र असवाले, आसगावच्या आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड डिझाईनचे प्राचार्य डॉ. मारियो, पीसीसी वेर्णाचे प्राचार्य डॉ. महेश पारापगवडा, गोवा टॅक्नॉलॉजी असोसिएशनचे (Goa Technology Association) मांगिरीश सालेलकर, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख रघुवीर वेर्णेकर यांनी केले.

फातोर्डा येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांची भरती विद्यापीठ परीक्षक मंडळातर्फे केली जाते. शिवाय विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना भेट देऊन पाहणी केली जाते. त्यामुळे शिक्षकांना दोष देणे चुकीचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Maths
Tiger Day 2022: वाघ असोत...जंगले असोत

डॉ. मारियो यांनी सांगितले, की 2019 साली अभियांत्रिकी महाविद्यालयात 1658 जागा उपलब्ध होत्या, 2029 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. गतसाली मात्र केवळ 1524 विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने 134 जागा रिकाम्या राहिल्या. बारावीत गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने असे घडले. खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा इतरांपेक्षा सरस आहे. त्यामुळे वर्षाकाठी 30 ते 40 कंपन्या प्लेसमेंटसाठी या महाविद्यालयांमध्ये येतात, हे कशाचे धोतक असा प्रश्र्नही त्यांनी उपस्थित केला.

अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होत असतात. खासगी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वत्र चमकलेले आढळतात. त्यांच्यासाठी अनेक सुविधा व संधी उपलब्ध केल्या जातात, असे डॉ. महेश यांनी सांगितले.

Maths
Panchayat Election: बार्देशात लोकप्रतिनिधींसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

...तर शैक्षणिक संस्थांचे भविष्य धोक्यात

ज्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च पदे अनुभवली, त्यांनीच जर खासगी महाविद्यालयांना चांगला सल्ला देण्याचे, सूचना करण्याचे सोडून टीका केली, तर या शैक्षणिक संस्थांच्या भविष्यातील वाटचालीवर परिणाम होणार नाही का? असा प्रश्न मांगिरीश सालेलकर यांनी उपस्थित केला. आता अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी महाविद्यालयांवर टीका झाली, तर प्रवेश भरतीवर परिणाम होणार नाही का? असा प्रश्र्न सालेलकर यांनी उपस्थित केला. आयटी कंपन्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना पसंती देत असल्याची सध्याची स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com