पुढील 5 वर्षांत धावणार 1200 इलेक्‍ट्रिक बसेस: माविन गुदिन्हो

सुखकर आराम व प्रदूषण रोखण्‍यासाठी उपाययोजना; केंद्राला साकडे
Mavin Gudhino
Mavin GudhinoDainik Gomantak

पणजी: प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच लोकांना आरामात प्रवास करता यावा यासाठी पुढील पाच वर्षांत 1200 इलेक्‍ट्रिक बसेस रस्त्यावर धावणार आहेत. या बसेससाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

या इलेक्‍ट्रिक बसेस राज्यात धावण्यास सुरुवात झाल्यावर सुमारे 80 टक्के प्रवासी वाहतुकीचा त्‍यात समावेश होईल. या वर्षअखेरीस राज्याला केंद्राकडून मंजूर झालेल्या सुमारे 100 नव्या इलेक्‍ट्रिक बसेस मिळणार आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे आणखी सुमारे 250 इलेक्‍ट्रिक बसेसची मागणी केली आहे.

Mavin Gudhino
'सरकारला गोमंतकीय जनतेची काळजीच नाही'

या बसेसही मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत, असे गुदिन्‍हो म्‍हणाले. या व्यतिरिक्त डिझेलवर चालणाऱ्या काही बसगाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. इलेक्‍ट्रिक बसेसची संख्या वाढल्यावर त्यासाठी आवश्‍यक असलेल्या चार्जिंग सेंटरची संख्याही वाढवण्याची गरज भासणार आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी कदंब वाहतूक महामंडळाची मालमत्ता आहे, त्या ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. कदंब महामंडळाचे या प्रवासी सेवेसाठी वाहतूक खात्यातर्फे धोरण तयार करण्यात येणार आहे अशी माहितीही त्‍यांनी दिली.

मांडवी पुलावर वाहतूक पोलिसांकडून स्पीडमीटर यंत्रणा उभी केली जात असल्याने पुलावरील वाहनांचा वेग प्रतितास 30 किमी असल्याने तसेच ओव्हर-टेकिंग करण्यास बंदी असल्याने कोणी वाहनचालक त्या नियमाचे उल्लंघन करण्याचे धाडस करत नाही, असे गुदिन्‍हो म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com