'सरकारला गोमंतकीय जनतेची काळजीच नाही'

वरद म्‍हार्दोळक: राज्‍यात कोरोना महामारीची चौथी लाट आल्‍यास उपाययोजना काय?
Varad Mhardolkar
Varad MhardolkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जून महिन्‍यात राज्‍यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्‍यता असल्‍याची माहिती गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्‍य सरकारने काही तयारी केली आहे का, असा सवाल गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्‍हार्दोळकर यांनी केला. येथील काँग्रेस भवनमध्ये घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्‍यात यापूर्वी आलेल्‍या कोरोनाच्‍या लाटांमध्ये सरकारच्‍या बेपर्वार्ईमुळे ३८३२ लोकांचा मृत्‍यू झाला. ऑक्‍सिजनचा तुटवडा, औषधांची कमतरता यामुळे गोमंतकीयांना आपले प्राण गमवावे लागले.

Varad Mhardolkar
हा निर्णय म्हणजे गोमंतकीय जनतेचा विजय: अमित पाटकर

औषध व ऑक्‍सिजन खरेदी प्रकरणात सरकारने मोठा घोटाळा केला. तातडीची खरेदी म्‍हणून अव्वाच्‍या सव्वा किमतीला औषधे खरेदी केली, असा आरोप म्‍हार्दोळकर यांनी केला. मुख्यमंत्री आणि आरोग्‍यमंत्री यांच्‍यातील अंतर्गत वादामुळे आरोग्‍य खात्‍यात अनागोंदी कारभार सुरू होता. एकमेकांत समन्‍वयाचा अभाव होता. त्‍यावेळी दुसरी लाट येण्याची शक्‍यता असूनही सरकारने कोणतीही काळजी घेतली नसल्‍याचे ते म्‍हणाले.

आता खुद्द गोमेकॉच्‍या अधिष्ठातांनी चौथी लाट येण्याची शक्‍यता वर्तविल्‍याने सरकारने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही म्‍हार्दोळकर यावेळी म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com