Hit And Run: रस्ता ओलांडताना दुचाकीने दिली धडक, 12 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; अल्पवयीन चालकाच्या पित्यावर गुन्हा दाखल

Peddem Mapusa Accident: पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव आकांक्षा बोरो असे आहे. ती इयत्ता सातवीत शिकत होती. आपल्या नातेवाईकांकडे रस्ता ओलांडून जात असताना हा अपघात घडला.
Peddem Mapusa Accident News
Mapusa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: पेडे-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज (मंगळवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव आकांक्षा बोरो असे आहे. ती इयत्ता सातवीत शिकत होती. आपल्या नातेवाईकांकडे रस्ता ओलांडून जात असताना हा अपघात घडला. तीन मुलींचा एक गट रस्ता ओलांडत होता. त्यावेळी आकांक्षा ही मागे राहिली.

Peddem Mapusa Accident News
Ambeli Accident: गाडी चालवता येत नसताना केले धाडस, ताबा सुटून कोसळला खाली! बंगालच्या तरुणाचा आंबेलीत अपघाती मृत्यू

त्यावेळी वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने तिला धडक दिली आणि त्याने घटनास्थळाहून दुचाकीसह त्वरित पलायन केले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी अवस्थेत तिला जिल्हा इस्पितळात नेले; परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Peddem Mapusa Accident News
Porvorim Flyover Accident: चार कर्मचारी थोडक्यात बचावले; पर्वरीत उड्डाणपुलाचा सेगमेंट कोसळला, CM देणार स्पष्टीकरण

दुचाकी चालवणारा मुलगा १६ वर्षांचा असून पोलिसांनी त्याचे वडील शब्बीर कासीम शेख (वय ४८ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पीडित मुलीचे कुटुंबीय मूळचे आसामचे आहेत. याप्रकरणी म्हापसा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com