Santa Cruz VP Goa: ऑलिव्हेरा सरपंचपदी कायम;अविश्‍वास ठराव बारगळला

Santa Cruz VP Goa: विरोधकांच्या गटातील दोघांनी काल सत्ताधाऱ्यांच्या वतीने उपसरपंचांसाठी मतदान केल्याने त्यांचे बहुमत झाले होते. त्यामुळे आज हा ठराव फेटाळला जाईल, हे अपेक्षितच होते.
Santa Cruz VP Goa
Santa Cruz VP GoaDainik Gomantak

Santa Cruz VP Goa

सांताक्रुझच्या सरपंच जेनिफर ऑलिव्हेरा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्‍वास ठराव विरोधी गटातील चार सदस्य बैठकीला अनुपस्थित राहिल्याने बारगळला. त्यामुळे सरपंच ऑलिव्हेरा यांना पदावरून खाली खेचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

विरोधकांच्या गटातील दोघांनी काल सत्ताधाऱ्यांच्या वतीने उपसरपंचांसाठी मतदान केल्याने त्यांचे बहुमत झाले होते. त्यामुळे आज हा ठराव फेटाळला जाईल, हे अपेक्षितच होते.

पंचायतीच्या ११ सदस्यांपैकी सरपंच जेनिफर ऑलिव्हेरा यांच्या गटाकडे सातजण तर विरोधी गटात चारच सदस्य उरले होते. त्यापैकी १० सदस्यांनी उपस्थिती लावली. अविश्‍वास ठराव मांडण्यात आला, तेव्हा विरोधी गटातील डॉमनिक पेरेरा, पीटर आरावजो, रोझी फर्नांडिस हे उपस्थित राहिले. त्यामुळे विरोधकांनी या अविश्‍वास ठरावाच्या बैठकीत भाग घेतला नाही. त्यामुळे हा ठराव बारगळल्याचे पंचायत सचिवांनी जाहीर केले.

सरपंच जेनिफर ऑलिव्हेरा यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी विद्यमान उपसरपंच संदीप सावंत यांनीच पुढाकार घेतला होता आणि सहाजणांचा गट एकत्रित आणून गटविकास अधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भातील पत्र ६ मे २०२४ रोजी दिले होते.

पंचायत सदस्यांना विश्‍वासात घेत नसल्याचा तसेच विकास होत नसल्याचा आरोप करत इतरांना घेऊन अविश्‍वास ठराव मांडला खरा; मात्र त्यांनी स्वतःच कोलांटी उडी मारत उपसरपंचपद मिळविले. ठराव मांडण्यामध्ये माझा पुढाकार नव्हता. मात्र, पाठिंबा होता, असे स्पष्टीकरण माजी उपसरपंच डॉमनिक परेरा यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले.

पतीदेवांची भक्कम साथ

सरपंच ऑलिव्हेरा या गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ पदावर आहेत. मात्र, या दोन वर्षांच्या काळात तीन उपसरपंच बदलले. त्यामध्ये डॉमनिक परेरा, मंगेश गावकर, एल्सन ब्रागांझा यांचा समावेश असून संदीप सावंत हे चौथे उपसरपंच झाले आहेत.

उपसरपंचांची संगीत खुर्ची सुरू असली तरी सरपंच पदावर पाच वर्षे राहण्यासाठी ऑलिव्हेरा यांनी जागा पक्की केली आहे. त्यांचे पती टॉमी हे पाठीशी असल्याने विरोधकांना यश मिळेल, असे सद्यस्थितीत वाटत नाही.

Santa Cruz VP Goa
Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

टॉमी ऑलिव्हेरा ‘किंगमेकर’

या पंचायतीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यासाठी केलेली तयारी पूर्णपणे धुळीस मिळाली आहे. यात पडद्यामागील सूत्रधार सरपंच ऑलिव्हेरा यांचे पती टॉमी ऑलिव्हेरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने हे शक्य झाले. ही पंचायत त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी विरोधी गटाने केलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com