12 th Result 2024 : ‘शांतादुर्गा’ची उत्कृष्ट निकालाची परंपरा; विविध शाखांमधून प्रथम आलेल्या गुणवंतांचा गौरव

12 th Result 2024 : विद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, शिशुवाटिकेचे व्यवस्थापक डॉ. कौस्तुभ पाटणेकर आणि प्राचार्य रामा पाटकर हजर होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
12 th Result 2024
12 th Result 2024 Dainik Gomantak

12 th Result 2024 :

डिचोलीच्या श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. गोवा शालांत आणि उच्च शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत या विद्यालयाचा सरासरी निकाल ९२.५९ टक्के लागला आहे.

कला शाखेचा निकाल ९१.१७ टक्के लागला असून, गौरी दामोदर नाईक कुंभारजुवेकर ९४.६६ टक्के गुण प्राप्त करुन कला शाखेसह विद्यालयात प्रथम आली. याच शाखेतील श्वेता शैलेंद्र मळीक ही विद्यार्थीनी ९४.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय आली. वाणिज्य शाखेचा निकाल ९७.१० टक्के लागला. या शाखेतून गजानन महेश मराठे ९३ टक्के गुण मिळवून प्रथम आला.

तर प्रणिता जबरसिंग पुरोहित ही विद्यार्थीनी ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय आली. विज्ञान शाखेचा निकाल ९६.२६ टक्के लागला असून या शाखेतून कृष्ण नवनाथ सुर्लकर ९३.५० टक्के गुण मिळवून प्रथम आला. मैत्रयी सुनील नाईक ही विद्यार्थीनी ९१.८३ गुण मिळवून द्वितीय आली. व्यावसायिक शाखेचा निकाल ६४.७० टक्के लागला आहे. श्रेयस शैलेश पाडेलकर ८१ टक्के गुण मिळवून प्रथम तर शर्वाणी संजय साळगावकर ७१ टक्के गुण मिळवून द्वितीय आली.

12 th Result 2024
Goa Politics: घटनेचा खून करून सावंत सरकारची स्थापना, उल्टा चोर कोतवाल को डांटे म्हणत काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर

मान्यवरांची उपस्थिती

बारावीच्या परीक्षेत विविध शाखांमधून प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व्यवस्थापन मंडळाकडून गौरव करण्यात आला. विद्यालयाच्या सभागृहात आयोजित गौरव सोहळ्यास व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, सचिव अभिजित तेली, खजिनदार राजेश धोंड,

विद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, शिशुवाटिकेचे व्यवस्थापक डॉ. कौस्तुभ पाटणेकर आणि प्राचार्य रामा पाटकर हजर होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक हजर होते. विजय सरदेसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य पाटकर यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com