Deposit Forfeiture: तुकाराम, रुबर्टही नाही वाचवू शकले; गोव्यात 16 पैकी 12 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Goa Candidate Deposit Forfeiture: गोव्यातील दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी आठ असे सोळा उमेदवार रिंगणात होते.
Goa Candidate Deposit Forfeiture
Goa Candidate Deposit ForfeitureDainik Gomantak

Goa Candidate Deposit Forfeiture

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अनेक बड्या बड्य़ा नेत्यांना मोठा झटका बसला आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

गोव्यात भाजप आणि काँग्रेस दोन्ही जागेवर विजयाची अपेक्षा होती मात्र दोघांनाही पारंपरिक गड राखण्यात यश आलंय. तर, निवडणूक लढलेल्या इतर 12 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

दक्षिण गोव्यातून आठ आणि उत्तरेतून आठ उमेदवार यावेळी रिंगणात होते. यात भाजप काँग्रेसच्या उमेदवारांसह आरजी, इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होते. गोव्यातून चार उमेदवार वगळता इतर 16 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यात तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे आरजी पक्षाचे उमेदवार तुकाराम परब आणि रुबर्ट परेरा देखील बचावले नाहीत.

कोणाकोणाचे डिपॉझिट झाले जप्त

उत्तर गोवा (North Goa Loksabha Candidates)

तुकाराम परब ( आरजी- फुटबॉल), मिलन वायंगणकर (बहुजन समाज पार्टी- हत्ती), सखाराम नाईक (अखिल भारतीय परिवार पार्टी- किटली), थॉमस फर्नांडिस (अपक्ष - अन्नाने भरलेले ताट), ॲड. विशाल नाईक (अपक्ष - गॅस सिलिंडर), शकील शेख (अपक्ष - हेल्मेट)

North Goa Loksabha Candidates
North Goa Loksabha Candidates
Goa Candidate Deposit Forfeiture
Yellow Alert In Goa: गोव्यात नऊ जूनपर्यंत यलो अलर्ट; मच्छीमारांना किनारी भागात न जाण्याचा सल्ला
South Goa Loksabha Candidates
South Goa Loksabha Candidates

दक्षिण गोवा (South Goa Loksabha Candidates)

रुबर्ट परेरा ( आरजी- फुटबॉल), डॉ. श्वेता गावकर (बहुजन समाज पार्टी- हत्ती), हरिश्चंद्र नाईक (करप्शन एबॉलिशन पार्टी - फुटबॉल खेळाडू), आलेक्सी फर्नांडिस (अपक्ष - फणस), डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष - बोट), दीपकुमार मापारी (अपक्ष - सीसीटीव्ही कॅमेरा)

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवाराला अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी मतदारसंघातील एकूण मतांपैकी किमान एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 25,000 आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 12,500 रुपये अनामत रक्कम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com