Kineco Kaman Composite Structure: कंपोझिट तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी असलेल्या गोव्याच्या कायनेको लिमिटेडला प्रतिष्ठेच्या अशा ‘वंदे भारत’ सेमी हायस्पीड ट्रेन्स Semi High Speed Trains अंतर्गत मॉड्युलर भागांचा पुरवठा आणि उभारणी करण्याच्या 113 कोटींच्या कामाची ऑर्डर मिळाली आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून कायनेकोला ही ऑर्डर मिळाली असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी कायनेकोला अशीच 68 ट्रेन्स फ्रंटची ऑर्डर मिळाली होती. यामुळे रेल्वेच्या अंतर्गत भागांचा सर्वाधिक पुरवठा करणारी कंपनी म्हणून कायनेकोला प्राधान्य मिळणार आहे. ‘वंदे भारत’ या सेमी हायस्पीड रेल्वेची निर्मिती पेरुंबुदूर चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाखाली करण्यात येते.
अधिक मजबूत व कौशल्यासह या गाड्या प्रवाशांना अधिक आरामदायीपणा प्रवासाचा अनुभव देतात. तर, कायनेकोच्या संचालक मंडळाचे चेअरमन आदित्य रेड्डी यांनी या महत्वपूर्ण ऑर्डरबद्दल आपण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत असल्याचे सांगितले.
शेखर सरदेसाई, कायनेको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक-
‘मेक इन इंडिया’ यशोगाथेचा भाग बनण्याची संधी लाभल्याबद्दल समाधान वाटतेय. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात कायनेको कंपनी आघाडीवर आहे. आता नव्या ऑर्डरमुळे आम्हाला आमच्याकडे असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक दर्जाचे उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.