Pramod Sawant: स्वयंपूर्ण गोव्यात महिलांचं योगदान; 11 हजार लाखपती दीदी झाल्याचा मुख्यमंत्र्यांना अभिमान

Swayampurn Goa: राज्यातील महिला करागरींना प्रोत्साहन देण्यासाठी मडगावात सरस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
Swayampurn Goa: राज्यातील महिला करागरींना प्रोत्साहन देण्यासाठी मडगावात सरस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
Saras Exhibition Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Saras Exhibition Madgao Goa

मडगाव: गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यात महिलांचा मोलाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत. मडगाव रवींद्र भवनात सरस या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. गावातील कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी सरस प्रदर्शनाचे आयोजन मडगाव येथे करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १० डिसेंबर) रोजी सुरु झालेल्या या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांसह सुभाष फळदेसाई, अलेक्स सिक्वेरा, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील महिला करागरींना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मडगावात सरस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गोव्यात सध्या ४२०० महिला स्वयंचलित गट आहेत आणि जवळपास ४ लाख महिला या गटांच्या सदस्या आहेत. या महिलांना हमीशिवाय बँकांमधून १ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. योजनेचा लाभ घेऊन कित्येक महिला मलेशिया आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये विदेशी दौरा करून आल्या आहेत.

Swayampurn Goa: राज्यातील महिला करागरींना प्रोत्साहन देण्यासाठी मडगावात सरस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
स्वयंपूर्ण गोव्याची जबाबदारी आता आयएएस अधिकाऱ्यांकडे

महिलांनी अभिमानेने आपण लखपती दीदी झाल्याचं आणि हे केवळ भाजप सरकारमुळे शक्य झाल्याचं सांगितलं अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. शिवाय ११ हजार महिला लखपती दीदी झाल्याची नोंद सरकारजवळ असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com