''दिल्लीतही काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे''

12 ते 18 जून दरम्यान गोव्यात 10 वे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होणार
Hindu Convention
Hindu ConventionDainik Gomantak
Published on
Updated on

आज दिल्लीतही काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जहांगीपुरी दंगलीतही काही लोक गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून आले आहे.जाणिवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते आज झालेल्या हिंदु धर्म संसद पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते. (10th All India Hindu Convention to be held in Goa )

यावेळी बोलताना डॉ. चारुदत्त पिंगळे मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 12 ते 18 जून दरम्यान गोव्यात 10 वे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनानंतर ‘हिंदू राष्ट्र संसद’ आयोजित करण्यात येणार असून, त्यात देश-विदेशातील हिंदू विचारांसाठी काम करणारे एक हजार जण सहभागी होणार आहेत. यामध्ये तीन विषयांचा विचार केला जाणार आहे. त्यात हिंदू मंदिरांचा विकास आणि हिंदू चेतनेचा विकास या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.

Hindu Convention
कोलवाळ कारागृहाबाहेर सुरक्षा रक्षकाकडे सापडले ड्रग्स

यावेळी बोलताना ज्ञानवापी खटल्यात हिंदूंची बाजू मांडणारे अधिवक्ता विष्णुशंकर जैन म्हणाले की, या धर्मसंसदेत पूजास्थान कायदा 1991 चाही विचार केला जाईल. ते म्हणाले की संपूर्ण राज्यघटनेमध्ये जर कोणताही कायदा सर्वात चुकीचा असेल तर तो म्हणजे 1991 च्या पूजास्थान कायदा. कारण हा कायदा एखाद्या नागरिकाला न्यायालयात जाण्यापासूनही रोखतो. ही तरतूद संविधानाच्या भावनेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. देशातील प्रत्येक नागरिकाला समान कायदेशीर हक्क देण्याच्या बाजूने असलेल्या आंबेडकरांच्या विचारसरणीच्याही हे विरुद्ध आहे.

Hindu Convention
जीएमसीचा आपत्कालीन औषध विभाग सक्षम करणार : विश्‍वजित राणे

भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, आज दिल्लीतही काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जहांगीपुरी दंगलीतही काही लोक गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून आले आहे. विचारपूर्वक डावपेच करून हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान आणि छत्तीसगडच्या सरकारांनाही हिंदू वर्गाच्या विरोधात आणि एका वर्गाच्या बाजूने निर्देश दिले जात आहेत, त्यामुळे आज हिंदू समाजाने एकत्र येऊन या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, मुस्लिम समाजाने उदारमतवादी मानसिकता दाखवून हिंदूंची प्रार्थनास्थळे हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावीत. देशावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांशी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचा कोणताही संबंध नाही, त्यामुळे मुस्लिम समाजाचा आम्हाला विरोध नाही, असे ते म्हणाले. दोन्ही समुदायांनी परस्पर सहकार्याचे वातावरण निर्माण करून हे प्रश्न सोडवले पाहिजेत, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com