कोलवाळ कारागृहाबाहेर सुरक्षा रक्षकाकडे सापडले ड्रग्स

208 ग्रॅम गांजासह 7 ग्रॅम कोकेन जप्त, सुरक्षारक्षक अटकेत
Colvale Jail
Colvale JailDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाबाहेर पोलिसांनी सुरक्षा रक्षक संदेश वरक (28, रा. इब्रामपूर-पेडणे) याच्याकडून 1 लाख 4 हजार 800 रुपयांचे ड्रग्स जप्त केले. याप्रकरणी वरक याला अटक करण्यात आली आहे.

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास केली. संशयित हा गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचा सुरक्षा रक्षक कर्मचारी आहे. कारागृहात ड्रग्सची तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब, हवालदार रूपेश कोरगावकर, सुधीर परब आणि कॉन्स्टेबल संदीप मळीक यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Colvale Jail
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्थसहाय्य त्वरित द्या : कुतिन्हो

दुचाकीच्या कप्प्यामध्ये ठेवले होते ड्रग्स

संशयित वरक हा कारागृहातून बाहेर आला आणि तुरुंगाबाहेर त्याने पार्क केलेल्या दुचाकीच्या जागी गेला. त्यावेळी पोलिस पथकाने संशयितास पकडले आणि त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता टाकीच्या कवरच्या खिशात 208 ग्रॅम गांजा आणि 7 ग्रॅम कोकेन मिळून 1 लाख 4 हजार 800 रुपयांचे ड्रग्स सापडले. हे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले. रात्री उशिरा पोलिसांनी ड्रग्सविरोधी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com