राज्यात मोठमोठे नेते, अधिकारी यांची नावे सांगून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. शनिवारी उसगावातील एका स्थानिकाला आयएएस अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून तब्बल 10.55 लाख रुपयांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
आपण राज्यातील आयएएस अधिकाऱ्याचा पीए असून एका तारांकित हॉटेलमध्ये टॅक्सी सेवेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने उसगाव येथील रहिवासी पार्सोल यांच्याकडून समीर धावसकर आणि दिनकर सावंत या दोघांनी 10.55 लाख रुपये घेतले. याहून मोठे कंत्राट हवे असल्यास त्यासाठी आणखी मोठी रक्कम द्यावी लागेल, असे पार्सोल यांना सांगण्यात आले होते.
सर्व पैसे दिल्यानंतर एक आठवड्यानंतर हे काम होईल, असे पार्सोल यांना सांगितले होते. मात्र, पैसे देऊन दोन आठवडे झाले, तरी हे काम न झाल्याने पार्सोल यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. याप्रकरणी समीर धावसकर आणि दिनकर सावंत यांच्याविरोधात त्यांनी पणजी पोलिसांनी तक्रार नोंदविली आहे.
याप्रकरणी या दोन्ही संशयित धावसकर आणि सावंत यांच्या विरोधात पणजी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
‘तो’ अधिकारीही रडारवर
या प्रकरणातील संशयित कोणत्या आयएएस अधिकाऱ्यासाठी काम करतात, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, दोन्ही संशयितांची ओळख पटली असून तो अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आहे. लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.