Libia Lobo Sardesai: अभिमानास्पद! गोमंतकीय स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Libia Lobo Sardesai gets Padmashri: मुक्तीसंग्रामात सरदेसाईंनी रेडिओद्वारे गोव्यासाठी आवाज उठवण्याचे काम केले होते.
Libia Lobo Sardesai: गोमंतकीय स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Libia Lobo SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Libia Lobo Sardesai gets Padmashri

पणजी: स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा मुक्तीसंग्रामात दिलेल्या योगदानासाठी सरदेसाई यांचा भारत सरकारच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

१०० वर्षीय लिबिया लोबो सरदेसाई यांनी गोवा मुक्तीसंग्रामात मोलाची कामगिरी केली होती. मुक्तीसंग्रामात सरदेसाईंनी रेडिओद्वारे गोव्यासाठी आवाज उठवण्याचे काम केले होते. त्यांनी दिलेल्या योगदानाचा उचित सन्मान भारत सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

Libia Lobo Sardesai: गोमंतकीय स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Goa Youth Festival: सर्वण-डिचोलीत गोवा युवा महोत्सवाला सुरुवात; मुख्यमंत्री सावंतांना अखेरच्या क्षणी निमंत्रण

लिबिया लोबो यांचा जन्म २५ मे १९२५ रोजी बार्देश तालुक्यातील पर्वरी गावात झाला. त्यांच्यावर एम. एन.रॉय यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. लोबो यांनी देशाच्या स्वातंत्र्याची १९४२ मध्ये सुरू झालेली चळवळ त्यांनी जवळून पाहिली.

स्वातंत्र्याचा आवाज दडपला जाऊ नये म्हणून कॅसरलॉकच्या निर्जनस्थानी ‘सुटकेचो आवाज’ नावाने गुप्त रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आणि ते चालवण्याची जबाबदारी त्या काळी वामन सरदेसाई आणि लिबिया लोबो ह्या उमद्या तरुण स्वातंत्र्यसैनिकांनी घेतली. हा रेडिओ केंद्र भारतीय सैन्याच्या आक्रमणाची बातमी प्रसारीत करायचे.

सुटकेचो आवाज हे गुप्त रेडिओ केंद्र चालवताना संपर्कात आलेल्या वामन सरदेसाई यांच्या प्रेमात लिबिया लोबो पडल्या आणि त्यांनी लग्नही केले. नंतरच्या काळातही त्यांनी समाजसेवेचा घेतलेला वसा सोडला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com