Margao Flyover: 100 कोटी मंजूर! मडगावात उड्डाण पुलाला हिरवा कंदील, तीन वर्षांत होणार पूर्ण

Margao Flyover: पुलामुळे कोलवा ते आके पॉवर हाऊसजवळील वाहतूक सुरळीत होणार असल्याचे साबांखाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
Margao Flyover
Margao FlyoverDainik Gomantak

Margao Flyover

शहरातील फोमेंतो कचेरी ते जुने रेल्वे स्थानक तसेच पुढे व्हिक्टर हॉस्पिटलपर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतराच्या उड्डाण पुलाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. शिवाय या कामासाठी 100 कोटी रुपयेही मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

फोमेंतो कचेरी ते व्हिक्टर हॉस्पिटल तसेच रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपुलाचे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल. त्यानंतर या भागातील वाहतुकीची समस्या सुटेल, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे. या उड्डाण पुलाला मान्यता दिल्याचे केंद्रीय मंत्रालयाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कळविले होते, असे सूत्रांनी सांगितले.

कोलवा सर्कल ते दामोदर हायस्कूल, फोमेंतो, गांधी मार्केट आणि जुने रेल्वे स्थानक मार्गे आके येथील पाॅवर हाऊसपर्यंतच्या मडगावमधील रिंग रोडचे दोन्ही बाजूंचे काम 2018 साली पूर्ण होऊन वाहतुक सुरू झाली होती.

मात्र, सिने लता, गांधी मार्केट येथील झोपडपट्ट्या आणि दुकानांमुळे रस्त्याच्या मध्यभागाचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते.

Margao Flyover
Night Clubs In Goa: आसगावकरांचा 'नाईट क्लब'ला विरोध; अपघात, तरुणांच्या भवितव्याची भीती

झोपडपट्टी, दुकानांना दिलासा

या भागातील रहिवासी आणि दुकानदारांच्या विरोधामुळे रस्त्याचे काम अपूर्ण राहिले होते. मात्र, आता हा उड्डाण पूल सिने लता, गांधी मार्केटजवळील झोपडपट्टी आणि काही दुकानांवरून जात असल्याने झोपडपट्टीत राहणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या उड्डाण पुलामुळे कोलवा ते आके पॉवर हाऊसजवळील वाहतूक सुरळीत होणार असल्याचे साबांखाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

कोंब येथेही उड्डाण पूल

कोंब-मडगाव येथील रेल्वे फाटकाजवळील उड्डाण पुलाला अद्याप मान्यता मिळायची आहे. मात्र, या उड्डाण पुलाच्या कामालाही लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या राज्यात वाहनांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. फोमेंतो कचेरी ते व्हिक्टर हॉस्पिटलदरम्यानच्या उड्डाण पुलाला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने सुमारे एक किलोमीटर अंतरातील कित्येक घरे आणि व्यापारी आस्थापनांना दिलासा मिळणार आहे, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com