Goa Congress : गोव्यानंतर भाजपचा आता कर्नाटकात आणखीन एक जुमला; काँग्रेसचे भाजपवर टिकास्त्र

भाजपचे कर्नाटकात मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन
LPG cylinder
LPG cylinder Dainik Gomantak
Published on
Updated on

भाजपने कर्नाटकातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिल्यावर काँग्रेसने त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा हा आणखीन एक जुमला असल्याची टिका काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर केली.

मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन गोव्यात भाजपने दिले होते ते आजपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. कर्नाटक आणि गोव्यातील जनतेला भाजपने खोटी आश्वासने दिली असे पणजीकर म्हणाले.

LPG cylinder
Mopa Taxi Counter : ‘मोपा’वरील टॅक्सी स्टॅन्‍डचा विषय चिघळला; असोसिएशनतर्फे धरणे आंदोलन

पणजीकर पुढे म्हणाले, "काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपया जमा करणार हे आश्वासनही भाजपने पाळले नाही. तो राजकीय जुमला होता हे लोकांनी आठवावे. वर्षाला तीन मोफत एलपीजी देण्याचे आश्वासन भाजपने कर्नाटकात दिले आहे."

"गोव्यात सरकार येवुन एक वर्ष उलटले, परंतु 2022 च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या जाहीरनाम्यातील मोफत सिलिंडर हे आश्वासन प्रत्यक्षात आलेले नाही. भाजपने मत मिळवण्यासाठी गोव्यातील सर्व कुटुंबांना वर्षाला 3 स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर दिले जातील, असे सांगितले. मात्र, सत्तेत आल्यानंतर केवळ बीपीएल कुटुंबांसाठी ही योजना केली जाईल, असे सांगितले."

"मात्र आजपर्यंत या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. यावरून भाजपने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. गोव्यातील महिला भाजप सरकारला मोफत एलपीजीबद्दल विचारत आहेत, परंतु ते याकडे लक्ष देत नाहीत. यावरून ही योजना सुरू होणार नाही असे स्पष्ट झाले आहे" असे पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com