Goa News: गोव्यात बजरंज दलाच्या शौर्य यात्रेचे आयोजन; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

05 December 2024 Marathi Breaking News: सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेषप्रदर्शन सोहळा, जत्रौत्सव आणि गोव्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी
Goa News: गोव्यात बजरंज दलाच्या शौर्य यात्रेचे आयोजन; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

गोव्यात बजरंज दलाच्या शौर्य यात्रेचे आयोजन!

गोवा बजरंग दल विभागाकडून ८ डिसेंबर रोजी होणार शौर्य यात्रा. कुडचडे नगरपालिका मैदानाकडून या यात्रेला सुरुवात होणार तसेच तेलंगणाचे आमदार राजा सिंह कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. सगळ्या हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने या शौर्य यात्रेला उपस्थित राहण्याचे केले आवाहन : विराज देसाई

मुरगाव बंदर कामगारांकडून निदर्शने!

वेतन कराराच्या अंमलबजावणी विलंब संदर्भात प्रश्न उपस्थित करून, प्रलंबित मुद्दा मार्गी लावण्याची मागणी. मुरगाव बंदर कामगारांनी केली निदर्शने.

वडभाग परिसरात नळ कोरडे!

उसगांव वडभाग येथे ४ दिवस पाणी नसल्याने महिलांची सार्वजनिक बांधकाम विभागात धाव. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी.

कॅशलेस EV कदंबांची सुविधा पुढे ढकलली

कदंबाच्या इवी बसेस गुरुवारपासून कॅशलेस करण्यात येणार होत्या पण लोकांनी अजूनही स्मार्ट ट्रांसलेट कार्ड केलेलं नसल्याने ही सुविधा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे: उल्हास तूयेकर

मांद्रे माजी सरपंच मारहाण प्रकरण; दोन संशयित सापडले

मांद्रे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी एक वाहन आणि दोन संशयित पोलिसांना सापडले असून पुढील तपास सुरू आहे.

मडगाव नगरपालिकेचा क्लार्क योगेश शेटकरला अटक

मडगाव पोलिसांनी मडगाव नगरपालिकेचा क्लार्क योगेश शेटकरला अटक केली, त्याने एमएमसीमध्ये 17 लाखांचा बनाव केला होता आणि तो जून 2024 पासून फरार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com