Goa News: नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे भाजपकडून चालूच, आप नेते संजय सिंह यांचा हल्लाबोल; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

04 December 2024 Marathi Breaking News: गोव्यातील जत्रौत्सव, अनंतोत्सव, सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेषप्रदर्शन सोहळा, सनबर्न आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News: नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे भाजपकडून चालूच, आप नेते संजय सिंह यांचा हल्लाबोल; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे भाजपकडून चालूच : संजय सिंह

'कॅश फॉर जॉब' विषयावरून गोवा आप ची दिल्ली कार्यालयात पत्रकार परिषद. गेली 10 वर्षे गोवा भाजप जनतेला नोकरीचे आमिष दाखवून फसवत असल्याचा आप चे केंद्रीय नेते संजय सिंह यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह, मंत्री आमदारांचा समावेश असल्याचा आरोप.

मी मुख्यमंत्रीपदाची कधीच मागणी केली नाही; सभापती रमेश तवडकर

राज्यात सध्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे. विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. याचदरम्यान, सभापती तवडकरांनी पुढे येत मी मंत्रिपद किंवा मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नाही, असे सभापती तवडकर म्हणाले. एवढ्यावरच न थांबता गोमंतकीयांची सेवा करणे हेच माझे ध्येय असल्याचे सभापती तवडकर पुढे म्हणाले.

महेश कोनाडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जीत आरोलकरांकडून निषेध

मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार जीत आरोलकर यांनी निषेध केला. आरोलकर म्हणालेत की, यावर कडक कारवाई केली जाईल.

सनबर्नसारख्या गोष्टींपासून मी दूर, पण...

सनबर्नसारख्या गोष्टींपासून मी दूर असतो. पण सरकारच्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. आपण बाजुला राहणे योग्य. सनबर्न आयोजनाच्या विषयावर मंत्री सुदीन ढवळीकरांची प्रतिक्रिया.

भुईपाल येथे रस्त्यावर झाड पडल्याने वीज वाहिनीचे नुकसान!

भुईपाल चेकपोस्ट जवळ बुधवारी (दि. ४ डिसेंबर) रोजी सकाळी ५च्या सुमारास रस्त्यावर झाड पडल्याने वाळपई होंडा रस्ता बंद झाला. तसेच वीज वाहिनीचे नुकसान झाले. अग्निशमन दलातर्फे मदतकार्य करत अडथळा दूर करण्यात आला.

'मेगा अपार दिवस'; लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार अपार आयडी

राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी (अपार) आयडी निर्मिती प्रक्रियेला गती देण्यासाठी, शिक्षण संचालनालयाने येत्या ९ आणि १० डिसेंबरला 'मेगा अपार दिवस' म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील शाळा विद्यार्थ्यांचे अपार कार्ड बनविण्यावर भर देतील. अपार हा १२ अंकी आयडी आहे, जो खाजगी, अनुदानित आणि सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाईल.

सावईवेऱ्यात सख्याहरीने अनंतोत्सवाला प्रारंभ

गोव्यातील प्रसिद्ध आणि जागृत अनंत देवस्थानाच्या अनंतोत्सवाला 'सख्याहरीने' आजपासून (दि. ४ डिसेंबर) प्रारंभ. पहिल्या दिवशी सख्याहरी, दुसऱ्या दिवशी सांगोडोत्सव, तिसऱ्या दिवशी गरुडासन, चौथ्या दिवशी विजयरथ, पाचव्या दिवशी सिंहासन, सहाव्या दिवशी हत्तीअंबारी आणि सातव्या दिवशी शेषासन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com