IPL 2025: किंग कोहलीने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, टी-20 क्रिकेटमध्ये 'ट्रिपल सेंच्युरी' लगावणारा बनला जगातील पहिला फलंदाज
आयपीएल 2025 मधील 52 वा सामना आरसीबी आणि सीएसके यांच्यात सध्या सामना खेळला जात आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्याने ख्रिस गेलचा मोठा टी-20 विक्रम मोडला. याशिवाय, त्याने एक खास 'ट्रिपल सेंच्युरी' देखील पूर्ण केली. अशी कामगिरी तो जगातील पहिला फलंदाज बनला. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये चेन्नईने नाणेफेक जिंकून यजमान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
विराटची तूफानी फलंदाजी
दरम्यान, सलामीवीर विराट कोहलीने (Virat Kohli) जेकब बेथेल (55 धावा) सोबत आपल्या विस्फोटक फलंदाजीने आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. कोहली उत्तम लयीत दिसत होता. तथापि, सॅम करनच्या चेंडूवर थर्ड मॅनवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. कोहलीने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 180 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 33 चेंडूत 62 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि तेवढेच षटकार होते. या खेळीसह त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.
गेलचा विक्रम मोडला
विराटने टी-20 क्रिकेटमध्ये एकाच ठिकाणी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने बंगळुरुमध्ये 151 षटकार मारुन नंबर-1 असलेल्या क्रिस गेलचा विक्रम मोडला. या मैदानावर 152 वा षटकार मारताच कोहलीने ही कामगिरी केली. या यादीतील इतर नावे अॅलेक्स हेल्स आणि रोहित शर्मा यांची आहेत.
कोहली त्रिशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला
टी-20 मध्ये एका संघाकडून खेळताना षटकारांचे त्रिशतक ठोकणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला. आरसीबीकडून खेळताना विराटने ही अद्भुत कामगिरी केली. तो या बाबतीतही आघाडीवर आहे. क्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसरे नाव रोहित शर्माचे आहे. किरॉन पोलार्ड आणि एमएस धोनी ही इतर नावे आहेत.
टी20 मध्ये एका संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
301- विराट कोहली (आरसीबी)*
263 - ख्रिस गेल (आरसीबी)
262 - रोहित शर्मा (MI)
258 - किरॉन पोलार्ड (MI)
257 - एमएस धोनी (सीएसके)
आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1146 - विराट कोहली विरुद्ध सीएसके*
1134 - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पीबीकेएस
1130 - विराट कोहली विरुद्ध डीसी
1104 - विराट कोहली विरुद्ध पीबीकेएस
1093 - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध केकेआर
1083 - रोहित शर्मा विरुद्ध केकेआर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.