Manish Jadhav
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला आहे. यादरम्यान, स्टार फलंदाज विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
36 वर्षीय कोहलीने या सामन्यात 17 धावा पूर्ण करताच त्याने टी 20 मध्ये 13,000 धावांचा पल्ला पार केला.
टी-20 मध्ये हा अविश्वसनीय पल्ला गाठणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला. तर क्रिकेट जगतातील तो पाचवा फलंदाज आहे, ज्याने 13 हजार धावांचा टप्पा पार केला.
विराटने 386 व्या टी-20 डावात ही शानदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल याच्यानंतर जलदगतीने 13 हजार धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
विराट कोहलीच्या मागे डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने आतापर्यंत 399 टी-20 सामन्यांमध्ये 12913 धावा केल्या आहेत. वॉर्नर आता आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाही, पण तो लीगमध्ये दिसतो. अशा परिस्थितीत त्यालाही 13 हजार धावा करण्याची संधी आहे. तथापि, तो विराटला मागे टाकू शकेल की नाही याबाबत थोडी शंका आहे.