Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak

Vinoo Mankad Trophy: गोव्याच्या फलंदाजांची हाराकिरी, 2 विकेट राखून बडोद्याचा विजय; गोलंदाजांचे प्रयत्न निष्फळ

Goa Vs Baroda: गोव्याच्या प्रभावी गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत बडोद्याच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने शनिवारी गोव्यावर दोन विकेट व पाच चेंडू राखून विजय मिळविला.
Published on

पणजी: गोव्याच्या प्रभावी गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत बडोद्याच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने शनिवारी गोव्यावर दोन विकेट व पाच चेंडू राखून विजय मिळविला. विनू मांकड करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटातील एकदिवसीय सामना हरियानातील लाहली येथील चौधरी बन्सी लाल क्रिकेट स्टेडियमवर झाला.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याला १७६ धावा करता आल्या. शंतनू नेवगी (८० धावा, ९९ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) व दिशांक मिस्कीन (५१ धावा, ९१ चेंडू, १ चौकार, १ षटकार) यांनी अर्धशतके नोंदविताना चौथ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली.

Goa Cricket Team
Vinoo Mankad Trophy: प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आला अंगलट! विदर्भाची गोव्यावर सहज मात; 161 धावांत गुंडाळला डाव

त्यामुळे गोव्याला थोडेफार सावरता आले. नंतर गोव्याच्या गोलंदाजांनी आटोकाट प्रयत्न केले; पण संरक्षणासाठी पुरेशा धावा नसल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी बडोद्याचे आठ फलंदाज ४९.१ षटकांत बाद केले.

Goa Cricket Team
Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

संक्षिप्त धावफलक

गोवा : ४७.३ षटकांत सर्वबाद १७६ (आदित्य कोटा २, आराध्य गोयल ४, शंतनू नेवगी ८०, यश कसवणकर ८, दिशांक मिस्कीन ५१, प्रियांशु वर्मा ३, वेदांत डब्राल ९, व्यंकट ०, समर्थ राणे ०, शिवेन बोरकर नाबाद ३, पीयूष देविदास ०, अमाहिदा २-१४, गौरव ३-२९, पियुष यादव ४-१४) पराभूत वि. बडोदा : ४९.१ षटकांत ८ बाद १७८ (स्मित राठवा ३१, प्रियांशु जाधव २३, हेत पटेल नाबाद नाबाद २९, समर्थ राणे १०-०-३८-१, व्यंकट १०-०-४८-३, पीयूष देविदास ९.१-१-३७-२, शिवेन बोरकर १०-०-३१-१, यश कसवणकर १०-२-२२-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com