
Vijay Merchant Trophy 2024 25 Goa Vs Pondicherry
पणजी: मध्यफळीतील आफ्रिद साब (१०५) याने बुधवारी खणखणीत शतक नोंदविले, त्यामुळे विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला पुदुचेरीवर एकूण २६३ धावांच्या आघाडीसह वरचष्मा राखता आला.
गुजरातमधील सूरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याने ५ बाद २२२ धावा केल्या. पहिल्या डावात त्यांना ४१ धावांची आघाडी मिळाली होती. कर्णधार शमिक कामत (४-२५) याच्या भेदक गोलंदाजीमुळे गोव्याने पुदुचेरीचा पहिला डाव ७ बाद ४५ वरून ७२ धावांत गुंडाळला. गोव्याने पहिल्या डावात ११३ धावा केल्या होत्या. सामन्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे.
आफ्रिदने स्पर्धेतील आपला सुरेख फॉर्म कायम राखताना १८४ चेंडूंत १४ चौकार व एका षटकारासह १०५ धावा केल्या. त्याने बडोदा व बंगालविरुद्ध अगोदरच्या लढतीत अर्धशतके केले होती. पुदुचेरीविरुद्ध दुसऱ्या डावात गोव्याचा डाव २ बाद १९ असा संकटात सापडलेला असताना आफ्रिदने खिंड लढवत गोव्याला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. आफ्रिदने सर्वांभ नाईक (२४) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. नंतर विनीत कामत (३८) याच्यासह चौथ्या विकेटसाठी ८२ धावांची, तर साई नाईक (नाबाद ३८) याच्यासह पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करून गोव्याला द्विशतक गाठून दिले. दिवसातील दोन षटकांचा खेळ बाकी असताना आफ्रिद बाद झाला.
गोवा, पहिला डाव ः ११३ व दुसरा डाव ः ७८ षटकांत ५ बाद २२२ (सर्वांभ नाईक २४, साईराज गोवेकर १, बरहान दाश २, आफ्रिद साब १०५, विनीत कामत ३८, साई नाईक नाबाद ३८, शमिक कामत नाबाद ५, पंकज भाटी १-४६, सुरेंद्र बिष्णोई २-७०, आर. जिवितेशन १-५२).
पुदुचेरी, पहिला डाव (७ बाद ४५ वरून) ः ४०.५ षटकांत सर्वबाद ७२ (शैलेश वैथियानाथन २९, शमिक कामत १४.५-८-२५-४).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.