Kabaddi Championship: राष्ट्रीय कबड्डीत गोव्याची घोडदौड; दोन्ही संघ खेलो इंडिया, ज्युनियर फेडरेशन कपसाठी पात्र

Goa Kabaddi Team: ५०व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या मुला व मुलींच्या संघाने घोडदौड राखनाताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.
Goa Kabaddi Team
Goa Kabaddi TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Junior National Kabaddi Championship

पणजी : उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेल्या ५०व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या मुला व मुलींच्या संघाने घोडदौड राखनाताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुलींच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत पंजाबला ४३-२६ गुणफरकाने हरविले. मुलांच्या संघाने ड गट साखळीत अव्वल स्थान मिळविताना अखेरच्या लढतीत तमिळनाडूस ४५-२८ असे पराजित केले, नंतर उपउपांत्यपूर्व लढतीत त्यांनी कर्नाटकला ५३-२४ गुणफरकाने हरविले.

राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे गोव्याचे दोन्ही संघ आता खेलो इंडिया, तसेच ज्युनियर फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

Goa Kabaddi Team
Goa Bird Festival: निसर्गप्रेमी आहात? मग गोव्यातील हा 'पक्षी महोत्सव' चुकवू नका; तारखा जाणून घ्या

उपांत्यपूर्व फेरीत मुलांचा संघ उत्तराखंडविरुद्ध, तर मुलींचा संघ महाराष्ट्राविरुद्ध खेळेल. स्पर्धेत गोव्याच्या दोन्ही संघांनी साखळी फेरीत शानदार खेळ केला, तर बाद फेरीतही त्याच खेळाची मालिका कायम राखली आहे. गतवर्षी राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत गोव्याच्या दोन्ही संघांना ब्राँझपदक मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com