Goa Cricket: गोवा क्रिकेट संघ दारुण पराभवाच्या छायेत; फॉलोऑननंतर आणखीच दुरावस्था

Thimmappiah Cricket Tournament: तिसऱ्या दिवसअखेर गोव्याची दुसऱ्या डावात २ बाद २० धावा अशी स्थिती झाली होती
Thimmappiah Cricket Tournament: तिसऱ्या दिवसअखेर गोव्याची दुसऱ्या डावात २ बाद २० धावा अशी स्थिती झाली होती
Goa Cricket NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या डॉ. कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्ध गोव्याचा संघ दारुण पराभवाच्या छायेत आहे. पहिल्या डावातील ३२१ धावांची पिछाडी व फॉलोऑन मिळाल्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी गोव्याची दुसऱ्या डावात २ बाद २० धावा अशी स्थिती झाली होती.

तत्पूर्वी मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व राखत धावपर्वत रचताना पहिला डाव ७ बाद ५६६ धावांवर घोषित केला. त्यांच्या तडाख्यासमोर गोव्याचे निष्प्रभ गोलंदाज मेटाकुटीस आले. हा सामना अळूर-बंगळूर येथे सुरू आहे.

Thimmappiah Cricket Tournament: तिसऱ्या दिवसअखेर गोव्याची दुसऱ्या डावात २ बाद २० धावा अशी स्थिती झाली होती
Goa Cricket: फलंदाजांच्या तडाख्यासमोर गोव्याच्या गोलंदाजांची हाराकिरी; मध्य प्रदेशचा धावांचा डोंगर

संक्षिप्त धावफलक ः मध्य प्रदेश, पहिला डाव ः ७ बाद ५६६ घोषित, गोवा, पहिला डाव ः ९० षटकांत सर्वबाद २४५ (रोहन कदम २२, सुयश प्रभुदेसाई ८, अभिनव तेजराणा ६६, स्नेहल कवठणकर ३०, के. व्ही. सिद्धार्थ १३, दीपराज गावकर २२, दर्शन मिसाळ ३८, मोहित रेडकर २०, कीथ पिंटो ९, हेरंब परब नाबाद ०, शुभम तारी जखमी खेळला नाही, कुमार कार्तिकेय ३-७६, आर्यन पांडे ३-४६), गोवा, दुसरा डाव ः ९ षटकांत २ बाद २० (सुयश ७, रोहन ०, दर्शन नाबाद ११, कीथ नाबाद ०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com