Goa Cricket: अर्जुन तेंडुलकरचे पाच बळी, अभिनवचे अर्धशतक; गोव्याची दमदार सुरुवात

Thimmappiah Cricket Tournament: थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामन्याला अळूर-बंगळूर येथे सुरवात झाली
Thimmappiah Cricket Tournament: थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामन्याला अळूर-बंगळूर येथे सुरवात झाली
Arjun Tendulkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Thimmappiah Cricket Tournament Karnataka

पणजी: गोव्यातर्फे तिसरा मोसम खेळणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने शनिवारी अतिशय भेदक मारा करून यजमान कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) इलेव्हन संघाचे कंबरडे मोडले. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना पहिल्या डावात पाच गडी टिपले.

‘केएससीए’च्या कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामन्याला शनिवारपासून अळूर-बंगळूर येथे सुरवात झाली. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या २४ वर्षीय मुलाने ४१ धावांत ५ गडी टिपले, तसेच वेगवान ऋत्विक नाईक (३-२७) व हेरंब परब (२-३०) यांनीही धक्के दिल्यामुळे केएससीए इलेव्हनचा पहिला डाव १०३ धावांत संपुष्टात आला.

नंतर स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात चौथे अर्धशतक केलेल्या डावखुऱ्या अभिनव तेजराणा याच्या नाबाद ८० धावांच्या बळावर गोव्याने पहिल्या दिवसअखेर १ बाद १४९ अशी दमदार फलंदाजी करून ४६ धावांची आघाडी प्राप्त केली. अभिनव याने रोहन कदम (४५ धावा, ७३ चेंडू, ८ चौकार) यांनी गोव्याला २९.५ षटकांत १०६ धावांची सलामी दिली.

अभिनव याने १५२ चेंडूंचा सामना करताना सात चौकार व दोन षटकार मारले. त्यापूर्वी, नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या केएससीए इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र अर्जुन व स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या ऋत्विक यांनी यजमान संघाची स्थिती अगोदर ४ बाद ७ धावा आणि नंतर ५ बाद २० धावा अशी दयनीय केली. तिसऱ्या क्रमांकावरील अक्षण राव याने झुंजार अर्धशतक केल्यामुळे यजमान संघाला धावसंख्येचे शतक पार करता आले.

Thimmappiah Cricket Tournament: थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामन्याला अळूर-बंगळूर येथे सुरवात झाली
Goa Cricket: पणजीत रंगणार गोवा विरुद्ध नागालँड क्रिकेट सामना; १८ वर्षांनंतर बांदोडकर मैदानावर रणजी लढत

सलग पराभवांनंतर संघात मोठे बदल

स्पर्धेत अगोदरच्या लढतीत अनुक्रमे मध्य प्रदेश व छत्तीसगडविरुद्ध नामुष्कीजनक मोठे पराभव पत्करलेल्या गोव्याने संघात अखेरच्या साखळी सामन्यात महत्त्वपूर्ण बदल केले. फलंदाजीत साफ अपयशी ठरलेला अनुभवी स्नेहल कवठणकर, तसेच मोठी धावसंख्या रचण्यात कमी पडलेला ईशान गडेकर यांच्यासह लक्षय गर्ग व विजेश प्रभुदेसाई या निष्प्रभ मध्यमगती गोलंदाजांना वगळण्यात आले. मागील लढतीत जखमी झालेला फिरकी गोलंदाज मोहित रेडकर खेळू शकला नाही. फलंदाज मंथन खुटकर, यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ व वेगवान ऋत्विक नाईक हे स्पर्धेतील पहिलाच सामना खेळले, तर वेगवान हेरंब परब व फिरकी कीथ पिंटो यांनी पुनरागमन केले. अगोदरच्या लढतीत अपयशी ठरलेले पाहुणे फलंदाज रोहन कदम व के. व्ही. सिद्धार्थ यांना आणखी एक संधी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com