Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा सलग तिसरा विजय! जम्मू काश्मीरला पाजले पाणी; सुयश, कश्यपची मॅचविनिंग खेळी

Goa vs Jammu Kashmir match: गोव्यासमोर विजयासाठी १६२ धावांचे आव्हान होते, त्यांनी १९ षटकांतच ३ बाद १६७ धावा करून लक्ष्य साध्य केले.
Suyash Prabhudesai Goa, Vijay Hazare Trophy 2024
Suyash PrabhudesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्णधार सुयश प्रभुदेसाई व कश्यप बखले पुन्हा एकदा गोव्यासाठी ‘मॅचविनिंग’ जोडी ठरली. त्यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर जम्मू-काश्मीरला सात विकेट राखून नमवत सय्यद मुश्ताक अली करडक टी-२ क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा, तर एकंदरीत चौथा विजय नोंदविला.

स्पर्धेच्या एलिट ब गटातील सामना शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झाला. गोव्यासमोर विजयासाठी १६२ धावांचे आव्हान होते, त्यांनी १९ षटकांतच ३ बाद १६७ धावा करून लक्ष्य साध्य केले. सलग तिसरे, तर कारकिर्दीतील एकंदरीत दहावे अर्धशतक केलेल्या सुयशने ३८ चेंडूंत नाबाद ५१ धावा करताना दोन चौकार व तेवढेच षटकार मारले.

तो सलग तिसऱ्यांदा सामन्याचा मानकरी ठरला. सलामीच्या कश्यप बखले याने सलग दुसरे अर्धशतक नोंदविले. त्याने ४४ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ५९ धावा केल्या. दीपराज गावकर (०) लगेच बाद झाल्यानंतर कश्यप व अभिनव तेजराणा (१७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली, मात्र अभिनव धावबाद झाला. नंतर कश्यप व सुयश यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला.

२६ धावांची आवश्यकता असताना कश्यप बाद झाल्यानंतर ललित यादवने १३ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह आक्रमक २४ धावा करून सुयशच्या साथीत गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गोव्याचा अखेरचा सामना ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्राविरुद्ध होईल.

Suyash Prabhudesai Goa, Vijay Hazare Trophy 2024
Syed Mushtaq Ali Trophy 2025: गोव्याने घेतला बदला! मध्य प्रदेशला नमविले; सुयश, अभिनवची अर्धशतके; तेंडुलकरला 3 बळी

त्यापूर्वी, गोव्याने नाणेफेक जिंकल्यानंतर जम्मू-काश्मीरला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यांना ७ बाद १६१ धावांची मजल मारता आली. जायबंदी अर्जुन तेंडुलकरच्या जागी संघात आलेल्या वेगवान शुभम तारी याने गोव्यातर्फे शानदार मारा करताना ३० धावांत तीन गडी बाद केले. जम्मू-काश्मीरतर्फे यावर हसन याने ४८, तर कर्णधार शुभम खजुरिया याने ४५ धावा केल्या.

Suyash Prabhudesai Goa, Vijay Hazare Trophy 2024
Syed Mushtaq Ali Trophy: 7 चौकार, 7 षटकार! 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'मास्टरक्लास', शतक झळकावत रचला इतिहास

संक्षिप्त धावफलक : जम्मू-काश्मीर ः २० षटकांत ७ बाद १६१ (शुभम खजुरिया ४५, यावर हसन ४८, कवलप्रीत सिंग ३०, अब्दुल समद २२, वासुकी कौशिक ३-०-१८-०, शुभम तारी ४-०-३०-३, हेरंब परब ३-०-३१-०, दीपराज गावकर २-०-२३-१, दर्शन मिसाळ ४-०-२७-०, विकास सिंग ४-०-३२-१) पराभूत वि. गोवा ः १९ षटकांत ३ बाद १६७ (कश्यप बखले ५९, दीपराज गावकर ०, अभिनव तेजराणा १७, सुयश प्रभुदेसाई नाबाद ५१, ललित यादव नाबाद २४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com