Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Sporting Club Goa Head Coach: स्पोर्टिंग क्लब द गोवाने दीपांकुर शर्मा यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
Sporting Club Goa Head Coach
Sporting Club GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्पोर्टिंग क्लब द गोवाने दीपांकुर शर्मा यांची  मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ‘एएफसी ए’ परवाना प्राप्त दीपांकुर यांना भारतीय फुटबॉलच्या विविध स्तरांवर दशकाहून अधिक काळ प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

गोवा प्रो-लीग २०२५-२६ चे विजेतेपद मिळवल्यानंतर आता स्पोर्टिंग क्लब गोवाने आय-लीग २ मध्ये दमदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने शर्मा यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी चानमारी एफसीसोबत काम करताना त्यांनी अवघ्या तीन आठवड्यांच्या पूर्वतयारीनंतर संघाला आय-लीग २ मधून आय-लीगमध्ये बढती मिळवून दिली होती.

Sporting Club Goa Head Coach
Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

तरुण आणि नवोदित खेळाडूंना संघबांधणी, शिस्त आणि खेळाची स्पष्ट शैली देण्यात दीपांकुर यांचा हातखंडा आहे. चानमारी एफसीपूर्वी त्यांनी कोलकत्यातील डायमंड हार्बर एफसीच्या राखीव संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आणि संघाला कोलकता फुटबॉल लीगमध्ये उपविजेतेपद मिळवून दिले. कोडागू एफसी, कॉर्बेट एफसी तसेच रिलायन्स फाउंडेशनच्या एलिट युवा योजनेतील १६ वर्षांखालील संघाचेही त्यांनी प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

मेक्सिको सिटीतील फ्यूट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून परदेशात प्रशिक्षण देणाऱ्या सुरवातीच्या भारतीय प्रशिक्षकांपैकी ते एक ठरले. गोव्यात जन्मलेल्या दीपांकुर यांनी पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून व्यावसायिक प्रशासन व कायद्याची ‘बीबीए-एलएलबी’ पदवी घेतली आहे.

Sporting Club Goa Head Coach
Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

‘‘स्पोर्टिंग क्लब गोवाचा समृद्ध इतिहास आणि अभिमानास्पद फुटबॉल संस्कृती आहे. या क्लबच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळणे या सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. मेहनत, महत्त्वाकांक्षा आणि निकालांच्या माध्यमातून ती जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे दीपांकुर यांनीसांगितले.

१२ सप्टेंबरपासून मोहीम सुरू

स्पोर्टिंग क्लब द गोवा १२ सप्टेंबर रोजी राय पंचायत मैदानावर धेंपो स्पोर्ट्‌स क्लबविरुद्ध होणाऱ्या चॅरिटी सामन्यातून नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच मैदानात उतरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com